Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २१ जुलै, २०२१, जुलै २१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-21T05:45:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Scholarship exam 2021: पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा मार्ग मोकळा; ऑगस्टमध्ये परीक्षा Rojgar News

Advertisement
2021: इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा (scholarship exam2021) मार्ग मोकळा झाला आहे. ही ऑगस्टमध्ये होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे. २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ऑगस्टमध्ये होणार आहेत. या परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. याआधी ही परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार होती. त्यानंतर करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण करोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा ८ ऑगस्ट रोजी घेण्याच्या निर्णयाला राज्य सरकारतर्फे मान्यता मिळाली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या परीक्षेस बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rmswhI
via nmkadda