Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १७ जुलै, २०२१, जुलै १७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-17T12:47:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

School Reopeing: कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शाळा सुरु? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती... Rojgar News

Advertisement
School Reopen2021: राज्यात करोनामुक्त गावांमध्ये १५ जुलैपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शाळा सुरु करताना शासनाच्या निर्देशांचे पालन करुन इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात एकूण किती शाळा असून त्यापैकी किती शाळा उडण्यात आला? यामध्ये जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती दाखविली? याची माहिती शालेय वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी यासंदर्भातील तक्ता शेअर केला आहे. मुंबई, मुंबई मनपा, पालघर, रायगड, सातारा, नागपूर, नाशिक परभणी या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्येमुळे शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हे ८ जिल्हे वगळून इतर जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु झाल्या असून तिथली विद्यार्थ्यांची उपस्थित संख्याही देण्यात आली आहे. शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात ८ वी ते बारावीच्या एकूण १९ हजार ९९७ शाळा सुरु आहेत. या शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर ती ४५ लाख ७ हजार ४४५ इतकी आहे. पण १५ जुलैपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर यातील केवळ ५,९४७ शाळा सुरु झाल्या. तर या शाळांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख १६ हजार ५९९ इतकी आहे. दरम्यान ठाणे, सिंधुदुर्ग आणि हिंगोली या ३ जिल्ह्यांमध्ये देखील शाळा सुरु झाल्या नाहीत. जिल्हानिहाय आकडेवारी पाहिली तर कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्वाधिक शाळा या १५ जुलैपासून खुल्या झाल्या. कोल्हापूरमध्ये ९४० शाळा सुरु झाल्या असून १ लाख ५५ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखवली. या जिल्ह्यात एकूण १ हजार ५४ शाळा असून २ लाख ८३ हजार २४३ संख्या आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १५ जुलैपासून सर्वाधिक कमी म्हणजे ४ शाळा झाल्या. यामध्यये २४९ विद्यार्थी उपस्थित होते. या जिल्ह्यात एकूण ४६५ शाळांमध्ये एकूण १ लाख ९२५ विद्यार्थी आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १ हजार ३०१ शाळा असून २ लाख ८४ हजार ३५४ विद्यार्थी आहेत. यापैकी १५ जुलैपासून १३३ शाळा सुरु झाल्या असून ८ हजार २३४ विद्यार्थी उपस्थित होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z4Kxnl
via nmkadda