Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १५ जुलै, २०२१, जुलै १५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-15T11:47:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

School Reopen: राज्यातील कोविडमुक्त भागात अनेक ठिकाणी शाळा सुरु Rojgar News

Advertisement
School Reopen: राज्यातील कोविडमुक्त असलेल्या अनेक ठिकाणी आजपासून झाल्या आहेत. करोनामुक्त असलेल्या गावांमध्ये नियमांचे पालन करुन ८ वी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानुसार दीड वर्षांच्या कालावधीनंतर शाळेची घंटा वाजली. ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक भागांमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत, तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल देखील नाहीत. अशा विद्यार्थी आणि पालकांतर्फे ऑफलाइन शाळा सुरु करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर करोनामुक्त गावांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन शाळा सुरु झाल्याने इथल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुण्यातील जिल्ह्यात असणाऱ्या साधारण १ हजार गावांमध्ये शाळा सुरु होतील. यातील बहुतांश शाळा सुरु झाल्या आहेत. पुढच्या आठवड्यापासून सर्व शाळांची कामे सुरु होतील असे पुणे जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. आमची शिक्षण अधिकाऱ्यांसोबत मिटींग झाली. यामध्ये आम्हाला शाळा सुरु करताना पालन करायच्या निर्देशांची माहिती देण्यात आली. आम्ही त्यानंतर पालकांना याबद्दल माहिती दिली. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा वेल्हे येथील शिक्षक संतोष घुगे यांनी व्यक्त केली. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहे. ग्रामपंचायतीतून परवानगी मिळाली असून आम्ही शाळा सुरु करत असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षक अरविंद जगताप यांनी सांगितले. शाळा सुरु करताना या नियमांचे पालन करावे लागणार ज्या गावात एक महिन्यापासून करोना नसेल करोना संदर्भात गावकऱ्यांमध्ये जागृकता असेल परिस्थिती अनुकूल असेल तर गाव पातळीवरील समिती म्हणजेच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यामाध्यमातून निर्णय गावात भविष्यात देखील करोना प्रतिबंधात्मक उपायांची योजना असेल अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरु शासनाने दिलेल्या एसओपीची अंमलबजावणी शाळा सुरु असलेल्या ठिकाणी व्यवस्थित होणे गरजेचे असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rbwsBD
via nmkadda