Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १९ जुलै, २०२१, जुलै १९, २०२१ WIB
Last Updated 2021-07-19T05:45:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSB SI Jobs 2021: सशस्त्र सीमा दलात १०वी पास असणाऱ्यांना संधी, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
SSB Sub SI : सशस्त्र सीमा दलातर्फे (Sashastra Seema Bal)एसएसबी सब इन्स्पेक्टर पदाची भरती(SSB SI Recruitment 2021) निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार, SSBची अधिकृत वेबसाइट ssbrectt.gov.in वर जाऊन आपला अर्ज करु शकतात. सरकारी नोकरी (Government job2021)च्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत अर्ज करु शकतात. या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करण्याआधी दिली गेलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. एसएसबी एसआय भर्ती २०२१ नोटिफिकेशनची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. नोकरीचा तपशील (SSB SI Vacancy 2021 Details) एसएसबी गृह मंत्रालयाच्या या भरती अभियानाअंतर्गत ग्रुप 'बी' नॉन गजेटिड (लढाऊ) आणि नॉन मिनिस्ट्रियलमध्ये सब इन्स्पेक्टर (SI) च्या एकूण १०० हून अधिक जागा रिक्त आहेत. ययामध्ये एसआय (पायनिअर)- १८ पद, एसआय (ड्राफ्टमॅन)-३ पद, एसआय (कम्युनिकेशन)-५६ पद आणि एसआय (स्टाफ नर्स महिला)- ३९ पद भरण्यात येणार आहेत. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) सब इन्स्पेक्टर (पायनियर)- या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजीनिअरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. सब इन्स्पेक्टर (ड्राफ्टमॅन)-दहावी पास आणि आयटीआय प्रमाणपत्र. ऑटोकॅडमध्ये १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे सब इन्स्पेक्टर(कम्युनिकेशन) - इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये डिग्री किंवा सीएस किंवा आयटीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणिकसोबत सायन्स स्ट्रीममध्ये शिक्षण असणे गरजेचे आहे. सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स महिला) - बारावी पास असण्यासोबतच जनरल नर्सिंगमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३० वर्षांहून अधिक असू नये. यासंदर्भातील अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. किती मिळेल पगार ? सशस्त्र सीमा दलामध्ये सब इन्स्पेक्टर (SI) भरती २०२१ साठी सर्व महत्वाची कागदपत्र आणि अटी पूर्ण केलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल. नोकरीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेवल-६ नुसार ३५ हजार ४०० रुपयांपासून १ लाख १२ हजार ४०० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. अर्ज शुल्क जनरल, ओबीसी आणि एडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारासाठी अर्ज शुल्क २०० रुपये आहे. इतर एससी,एसटी, माजी सैनिक आणि महिला उमेदवाराकडून अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rjo7vI
via nmkadda