Advertisement

CGL Exam Dates: कर्मचारी निवड आयोगाने सीजीएल कम्बाइंड ग्रॅज्युएट लेवल परीक्षेच्या(Combined Graduate Level- SSC CGL Exam) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार एसएससी सीजीएल टियर I परीक्षा १३ ऑगस्टला होणार आहे. याशिवाय एसएससी सीजीएल स्किल टेस्ट सप्टेंबरमध्ये १५ आणि १६ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. तसेच उमेदवार परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर लॉगिन करुन मिळवू शकतात. टियर १ एक्झाम- १३ ऑगस्ट २०२१ ते २४ ऑगस्ट २०२१ स्किल टेस्ट- १५ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर २०२१ SSC CGL परीक्षेच्या माध्यमातून एकूण ७००० हून अधिक पदांची भरती आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा २०२० मध्ये आयोजित केली जाणार होती. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली. पण एसएससीने सीजीएल आणि स्किल टेस्ट परीक्षेसाठी नव्या तारखांची घोषणा केली आहे. ही निवड चार स्तरांच्या परीक्षांमधून होणार आहे. एसएससी २०२० चे प्रवेशपत्र जुलैच्या अखेरीस जाहीर केले जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षेचा पहिला राऊंड पास होणे गरजेचे आहे. ही भरती गट ब आणि गट सी पदांसाठी घेण्यात येणार आहे. रिक्त पदांची यादी अधिकृत वेबसाइटवर दिल्या गेलेल्या लिंकवर जाऊन तपासता येऊ शकते. उमेदवाराने हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की नियमानुसार जर त्यांना परीक्षेच्या वेळी कोणतेही गैरवर्तन किंवा चुकीचा प्रकार आढला तर त्यांना दहा वर्षे एसएससीच्या सर्व परीक्षांमधून पदच्युत किंवा अपात्र ठरविण्यात येईल. एसएससी सीजीएल परीक्षेबद्दल एसएससी सीजीएल परीक्षा विविध गट बीआणि गट सी पदांवर भरतीसाठी घेतली जाते. उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ही परीक्षा नोटीफिकेशन वर्ष २०२० नुसार होत आहे. एसएससी सीजीएल २०२१ परीक्षेची नोटीस किंवा त्यावरील अपडेट अद्याप जाहीर करण्यात आले नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z7JS4x
via nmkadda