Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २६ जुलै, २०२१, जुलै २६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-26T13:43:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSC CHSL 2020 Admit Card: करोनामुळे परीक्षा देता न आलेल्यांना संधी, प्रवेश पत्र जाहीर Rojgar News

Advertisement
SSC 2021 : स्टाफ सिलेक्शन कमीशनच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सीएचएसएल परीक्षा २०२० च्या टियर १ मधील उर्वरित उमेदवारांसाठी जाहीर करण्यात आले आहे. जे उमेदवार या परीक्षेत सहभागी झाले नव्हते ते एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनने उर्वरित उमेदवारांचे प्रवेश पत्र जाहीर केले आहे. एसएससीतर्फे कम्बाइंड हायर सेकेंडरी लेवल म्हणजे सीएचएसएलसाठी अर्ज प्रक्रिया ६ नोव्हेंबर २०२० ला सुरु झाली होती. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २६ डिसेंबर २०२० पर्यंत वेळ देण्यात आला होता. ऑनलाइन फीस जमा करण्याची तारीख २८ डिसेंबर २०२० होती. ही परीक्षा १२ एप्रिलला सुरु झाली आणि २७ एप्रिल २०२१ पर्यंत सुरु होती. ज्या उमेदवारांना करोनामुळे परीक्षा देता आली नाही ते या परीक्षेची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अशा उर्वरित उमेदवारांसाठी प्रवेश पत्र वेबसाइटवर उपलब्ध आहे. या उमेदवारांसाठी ४ ऑगस्टला परीक्षा होणार आहे. प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी ssc ची वेबसाइट ssc.nic.in वर जा वेबसाइटच्या होमपेजवर Result सेक्शनवर क्लिक करा यानंतर SSC CHSL 10+2 Recruitment 2020 Tier I Exam Admit Card (only for Remaining Candidate) 2021 यावर क्लिक करा इथे मागितलेली माहिती भरा सबमिट केल्यावर Admit Card खुले होईल प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि प्रिंट घेऊन ठेवा. SSC CHSL एक्झाम पॅटर्न ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा म्हणजे एसएससी CHSL टियर १ परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना टियर-२ परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. टियर २ परीक्षेच्या तारखेची घोषणा टियर १ च्या रिझल्टची घोषणा झाल्यानंतर केली जाईल. टियर २ परीक्षेनंतर स्किल आणि कॉम्प्युटर टायपिंग टेस्ट होईल. SSC CHSL Tier-I ची परीक्षा ऑनलाइन होते. एकूण १०० बहुपर्यायी प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतात. यासाठी २०० गुणांचा पेपेर असतो. उमेदवारांना ६० मिनिटांचा वेळ मिळतो. PWD श्रेणीतील विद्यार्थ्यांना ८० मिनिटांचा वेळ दिला जातो. परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.५० गुण कापले जातात. या पदांवर भरती या परीक्षेच्या माध्यमातून लोअर डिव्हीजन क्लर्क, पोस्टल असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर सहित इतर पदांवर नियुक्ती केली जाईल. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BKubCg
via nmkadda