Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २ जुलै, २०२१, जुलै ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-02T13:47:05Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

विद्युत मंडळ पारेषण कंपनीत शिका आणि कमवा, SSCआणि ITIप्रमाणपत्र असेल तर अर्ज करा Rojgar News

Advertisement
State Board Transmission Company Traning Programe : कोकणात विशेषत: रत्नागिरीत राहणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. रत्नागिरी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीमध्ये भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य लिमिटेडमध्ये आस्थापनेवरील पदांच्या एकूण २७ जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. उमेदवारांना १२ जुलै २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या भरतीच्या माध्यमातून इलेक्ट्रिशन पदाच्या २७ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा पास असणे अपेक्षित आहे. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली अशा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होणाऱ्यांना विद्यावेतन दिले जाईल. हे वेतन शासनाच्या नियमाप्रमाणे असेल. पदसंख्या वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा किंवा वाढविण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे राहील. यासंदर्भातील माहिती उमेदवारास कळविणे हे व्यवस्थापनास बंधनकारक नसेल. तसेच शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी आरक्षण हे शासनाच्या नियमानुसार असेल. इच्छुक उमेदवारांनी https://ift.tt/34M3qNn वर अर्ज करायचा आहे. विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता देखील वेगळी आहे. यासंदर्भातील मूळ जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज करताना दहावी आणि आयटीआय प्रमाणपत्रावरील नाव हे आधार कार्डवरील नावाशी सुसंगत आहे का ? याची पडताळणी करावी. एस.एस.सी आणि आयटीआय (चारही सेमिस्टर) च्या गुणपत्रिकेची प्रत ऑनलाईन अपलोड करणे गरजेचे आहे. शिकाऊ उमेदवाराची सही, पालकांची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, SSC आणि ITI चे गुण काळजीपूर्वक भरावे लागतील. शिकाऊ उमेदवाराने राजकीय व्यक्तीकडून दबाव आणल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. उमेदवाराचे वय हे १८ ते ३० वर्षांच्या आत असणे गरजेचे आहे. मागासवर्गातील विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे. आरक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत जात प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवाराला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्यासाटी व्यवस्थापन बांधिल नसेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wchbBu
via nmkadda