Advertisement
SSC JHT Result 2020: कर्मचारी निवड आयोग (SSC) ने पेपर २ साठी एसएससी जेएचटी निकाल २०२० (SSC JHT Result)ची घोषणा केली आहे. जे उमेदवार , ज्युनिअर आणि सिनीअर ट्रान्सलेटर परीक्षा २०२० पेपर २ साठी उपस्थित होते ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. ssc.nic.in वर संपूर्ण निकाल पाहता येणार आहे. पेपर २ परीक्षेत एकूण १६६८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा देशभरात १४ फेब्रुवारी २०२१ ला आयोजित करण्यात आली होती. पेपर १ आणि पेपर २ मधील गुणांच्या आधारे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी निवडण्यात आले आहे. अधिकृत नोटीसनुसार, कागदपत्र पडताळणीचे काम आयोगाच्या विभागीय कार्यालयांच्या वेबसाइटद्वारे होणार आहे. या ठिकाणी हा पर्याय देण्यात येणार आहे. बातमीखालच्या लिंकवर जाऊन तुम्ही थेट रिझल्ट पाहू शकता. SSC JHT Result 2020: असा तपासा निकाल सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा होमपेजवर दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करा मागितलेली माहिती भरा रिझल्ट तुमच्या समोर असेल रिझल्ट डाऊनलोड करा भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा. पात्र आणि अपात्र उमेदवारांचे गुण २२ जुलै २०२१ ला अधिकृत वेबसाइवर अपलोड केले जातील. उमेदवार २२ जुलैपासून ११ ऑगस्ट २०२१ पर्यंत आपले गुण तपासू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवार SSC ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ki9nf9
via nmkadda