TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

SSC Result 2021: या आठवड्यात दहावीच्या निकालाची घोषणा? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती Rojgar News

2021: महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत घोषित होऊ शकतो अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या निकालासंदर्भातील माहितीसाठी या वेबसाइटवर लक्ष ठेवून राहावे लागेल. देशात करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेण्यात आले. शिक्षण क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम झाला. दहावी आणि बारावीच्या परीक्षा आधी स्थगित आणि नंतर रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने निकालासाठी मूल्यांकन पद्धतीची घोषणा केली होती. याच आधारे महाराष्ट्र बोर्डातर्फे २०२१ ची घोषणा केली जाणार आहे. या मूल्यांकन पद्धतीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या शालांतर्गत झालेल्या परीक्षा आणि असेसमेंटच्या आधारे गुण दिले जाणार आहेत. यातील ५० टक्के वेटेज हे नववीतील गुणांच्या आधारे दिले जाणार आहेत. तर ३०टक्के वेटेज हे इंटरनल असेसमेंट आणि उर्वरीत २० टक्के वेटेज हे प्रॅक्टीकल आणि होमवर्कच्या असाइनमेंटला दिले जाणार आहे. वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा सीबीएसई बोर्डाने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर देशभरातील अनेक राज्यांतील शिक्षण बोर्डाने असा निर्णय घेतला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xC0zEK
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या