Advertisement
SSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल (Class x Result) जाहीर झाला असून एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागानुसार रिझल्टमध्ये यंदा पुन्हा कोकण विभागाने बाजी मारली असून स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहेत. दरवर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समानाधी नसतील तर त्यांना पेपर्स रिचेकींदची संधी दिली जाते. मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रिव्हॅल्युएशनसाठी ऑनलाईन अर्ज बोर्डाकडून सुरु केला जातो. अर्ज भरल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांमध्ये बोर्डाकडून दहावीचा रिचेकींग निकाल जाहीर होतो. पण यंदा मात्र विद्यार्थ्यांना अशी संधी मिळणार नाही. परीक्षाच झाली नसल्याने पेपर तपासण्याचा प्रश्न उद्भवत नाही. हे गुण अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे देण्यात आले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे गुडपडताळणीच्या तारखा जाहीर यंदा जाहीर झाल्या नाहीत. तरीही जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर समाधानी नसतील आणि आपली नापसंती बोर्डाकडे कळवतील त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा होणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देताना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. असा पाहा निकाल SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा तुमचा सीट नंबर टाइप करा आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका तुमच्या स्क्रीनवर निकाल दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिट काढून ठेवा कुठे पाहाल निकाल? https://ift.tt/2U7pMIW या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hKFPp6
via nmkadda