Advertisement

Result 2021: कर्मचारी निवड आयोगाने (,SSC) मंगळवारी ६ जुलै २०२१ रोजी विविध परीक्षांच्या निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे. यानुसार ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (Junior Hindi Translator), ज्युनियर ट्रान्सलेटर (Junior Translator) आणि सीनियर हिंदी ट्रान्सलेटर एग्जाम 2020 सेकंड पेपर (Senior Hindi Translator Examination, 2020 Paper-II Result)परीक्षांचा निकाल १५ जुलै २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. सोबतच, कंबाइंड हायर सेकेंडरी (10+2) लेवल एक्झामिनेशन 2018 फायनल निकाल आणि कंबाइंड हायर सेकेंडरी (10+2) लेवल एक्झामिनेशन 2019 टियर II परीक्षेचा निकाल ३० सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने यासंबंधी ssc.nic.in वर एक नोटिफिकेशन जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षा दिल्या आहेत, ते अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपशीलवार नोटिफिकेशन वाचू शकतील. संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेनुसार, ज्युनियर इंजिनीअर सिविल, मेकॅनिक परीक्षा सेकंडचा निकाल ३० नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट वर पुढील पद्धतीने निकाल पाहू शकतील. SSC Result 2021: ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर सह विविध परीक्षांचा निकाल असा पाहा - ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर आणि सिनीयर हिंदी ट्रान्सलेटर सह अन्य परीक्षांचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अधिकृत संकेतस्थळ ssc.nic.in वर जावे. यानंतर होम पेज वर उपलब्ध निकालाच्या लिंक वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक नवी पीडीएफ फाइल उघडेल, येथे उमेदवार आपला निकाल पाहू शकतात. यानंतर फाइल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घेऊन ठेवा. दरम्यान, आयोगाने विविध परीक्षांच्या सुधारित तारखादेखील जाहीर केल्या आहेत. यानुसार, दिल्ली पोलीस आणि सीएपीएफ (CAPFs) मध्ये सब इन्स्पेक्टर आणि सीआईएसएफ (CISF) असिस्टंट सब इस्पेक्टर परीक्षा (पेपर- II) 2019 चे आयोजन २६ जुलै २०२१ रोजी विविध केंद्रांवर करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dRB22D
via nmkadda