Syllabus Cut: पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात Rojgar News

Syllabus Cut: पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात Rojgar News

करोना काळात सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. 'सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. कोविड- १९ च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध जगातील विद्यार्थ्याना संकटास सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यामध्ये सुध्दा ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा मुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. करोनाच्या ची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन व शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3By3fFW
via nmkadda

0 Response to "Syllabus Cut: पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel