UGC NET 2021 करोनामुळे होती स्थगित, परीक्षेची नवी तारीख आणि हॉलतिकिटाबद्दल जाणून घ्या Rojgar News

UGC NET 2021 करोनामुळे होती स्थगित, परीक्षेची नवी तारीख आणि हॉलतिकिटाबद्दल जाणून घ्या Rojgar News

Exam: विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET 2021)मे २०२१ सत्राच्या नव्या तारखेची लवकरच घोषणा होणार आहे. परीक्षेची नवी तारीख नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाहीर केली जाणार आहे. याआधी एनटीएने यूजीसी नेट परीक्षेची तारीख २ फेब्रुवारी जाहीर केली होती. ज्यानुसार २ ते १७ मे दरम्यान परीक्षा होणार होती. पण देशात करोनाची दुसरी लाट आल्याने परीक्षा स्थगित करावी लागली. मे मध्ये होणारी परीक्षा स्थगित करण्याबाबत एनटीएने नोटीस जाहीर केली. करोना स्थितीमध्ये सुधार झाल्यानंतर नव्या तारखांची घोषणा केली जाईल असे यात म्हटले होते. तसेच परीक्षेच्या तारखांची घोषणा ही १५ दिवस आधी केली जाईल असेही सांगण्यात आले. ( Date Latest News)त्यामुळे आता ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षेच्या तारखेची घोषणा होऊ शकते. यावर कोणता अधिकृत दुजोरा आलेला नाही. एनटीए एप्रिल महिन्यात हॉल तिकिट जाहीर करेल असे आधी सांगण्यात आले. मग परीक्षा स्थगित झाली. अशावेळी जून सत्रासाठी हॉलतिकिट जुलै आणि डिसेंबर सत्रासाठी हॉलतिकिट नोव्हेंबरमध्ये येऊ शकते. (UGC NET 2021 Exam Admit Card) हॉल तिकिट जाहीर झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाऊनलोड करु शकतात. नव्या तारखांची घोषणा करण्यासोबतच हॉल तिकिटाबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर महत्वाची माहिती टाकून हॉल तिकिट डाऊनलोड करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37bzHjs
via nmkadda

0 Response to "UGC NET 2021 करोनामुळे होती स्थगित, परीक्षेची नवी तारीख आणि हॉलतिकिटाबद्दल जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel