Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १० जुलै, २०२१, जुलै १०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-10T06:47:33Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC Civil Services Prelims 2021: उमेदवारांना १२ जुलैपर्यंत एक्झाम विंडो बदलण्याची संधी Rojgar News

Advertisement
UPSC Civil Services Prelims 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) ने नागरी सेवा प्रिलिम्स परीक्षा २०२१ () च्या संदर्भात एक महत्वाची सूचना जाहीर केली आहे. याअंतर्गत १० ऑक्टोबर २०२१ ला होणाऱ्या परीक्षेसाठी अॅप्लिकेशन विंडो खुली केली जात आहे. १२ जुलैपासून होणाऱ्या विंडोमध्ये उमेदवार आपल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करु शकतात. १९ जुलैपर्यंत हे बदल होतील. यूपीएससीने यासंदर्भात एक अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अशामध्ये परीक्षेत सहभागी होणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर नोटिफिकेशन पाहू शकता. यूपीएससीने आपल्या अधिकृत सूचनेमध्ये म्हटल्यानुसार, नागरी सेवा प्रारंभिक परीक्षा २०२१ च्या उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता आयोगाने परीक्षा केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये अल्मोडा, उत्तराखंड, श्रीनगर, नाशिक, महाराष्ट्र आणि सूरतमध्ये चार अतिरिक्त केंद्र चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच नागरी सेवा प्रिलिम्स सहित इतर परीक्षेच्या उमेदवारांना आपले केंद्र आपल्या आवडीनुसार बदलण्याचा निर्णय घेता येणार आहे. परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यासंदर्भात पहीला अर्ज करणाऱ्यास पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय आधी देण्यात आलेल्या नियम आणि अटींमध्ये कोणता बदल होणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्र बदलायचे नाही त्यांना लॉगिनमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही. परीक्षा केंद्र बदलण्याची प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. यानुसार पहिला टप्पा १९ जुलैनंतर २६ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. उमेदवार ३० जुलै २०२१ संध्याकाळी ६ पर्यंत परीक्षा केंद्रात बदल करु शकतात. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hZ4zJ1
via nmkadda