Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ७ जुलै, २०२१, जुलै ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-07T11:47:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC CMS 2021: ८३८ पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी नोटिफिकेशन जाहीर, इथे करा अर्ज Rojgar News

Advertisement
UPSC CMS Exam Notification 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) होणाऱ्या कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम (CMS 2021)साठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशननुसार एकूण ८३८ पदांवर कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामचे आयोजन केले जाणारआहे. हे नोटिफिकेशन तुम्हाला यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल. कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. नोकरीचा तपशील, पात्रता आणि इतर माहितीसंदर्भात माहिती upsc.gov.in वर नोटिफिकेशनमार्फत मिळू शकेल. या परीक्षेसंदर्भातील पहिले नोटिफिकेशन ५ मे २०२१ ला जाहीर केले जाणार होते. पण पुढील तारखेपर्यंत हे नोटिफिकेशन स्थगित करण्यात आले होते. २५ जूनला जाहीर झालेल्या यूपीएससीच्या वार्षिक कॅलेंडरनुसार कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षेसाठी नोटिफिकेशन ७ जुलैला जाहीर केले गेले. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचाय त्यांनी upsconline.nic.in वर जाऊन २७ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकता. परीक्षेचे आयोजन २१ नोव्हेंबर २०२१ ला करण्यात आले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे उमेदवारांकडून २०० रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. अर्ज शुल्क हे एसबीआयच्या कोणत्याही ब्रांचमध्ये कॅश पेमेंट जमा करुन केले जाऊ शकते. किंवा यासाठी एसबीआयच्या नेट बॅंकिंग सुविधेचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच महिला उमेदवार अनुसूचित जाती आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून शुल्क घेतले जाणार नाही. सीएमएस परीक्षा कॉम्प्यूटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना कॉम्प्यूटर बेस्ड मोडमध्ये २ ऑब्जेक्टीव्ह पेपर परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. प्रत्येक पेपरची परीक्षा २५० गुणांची असेल. यामध्ये उमेदवाराला परीक्षेसाठी २ तासांचा वेळ दिला जाणार आहे. या परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवाराला मुलाखत (Personality Test) फेरीसाठी बोलवले जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TJWgZh
via nmkadda