Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ६ जुलै, २०२१, जुलै ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-06T11:47:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC CMS Exam Notification 2021: कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामसाठी नोटिफिकेशन ७ जुलैला Rojgar News

Advertisement
CMS Exam Notification 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे (CMS 2021)साठी ७ जुलै २०२१ ला नोटिफिकेन जाहीर करण्यात येणार आहे. यासोबतच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील सुरु केली जाणार आहे. नोटिफिकेशन यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध असेल. जे पात्र उमेदवार सीएमएस सेवा परीक्षेसाठी इच्छुक असतील त्यांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. नोकरीचा तपशील, पात्रता आणि इतर माहितीसंदर्भात माहिती upsc.gov.in वर नोटिफिकेशनमार्फत मिळू शकेल. या परीक्षेसंदर्भातील पहिले नोटिफिकेशन ५ मे २०२१ ला जाहीर केले जाणार होते. पण पुढील तारखेपर्यंत हे नोटिफिकेशन स्थगित करण्यात आले. २५ जूनला जाहीर झालेल्या यूपीएससीच्या वार्षिक कॅलेंडरनुसार कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षेसाठी नोटिफिकेशन ७ जुलैला जाहीर केले जाणार आहे. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचाय त्यांनी upsconline.nic.in वर जाऊन २७ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकता. परीक्षेचे आयोजन २१ नोव्हेंबर २०२१ ला करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिक माहिती नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर मिळू शकणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे उमेदवारांकडून २०० रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. अर्ज शुल्क हे एसबीआयच्या कोणत्याही ब्रांचमध्ये कॅश पेमेंट जमा करुन केले जाऊ शकते. किंवा यासाठी एसबीआयच्या नेट बॅंकिंग सुविधेचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच महिला उमेदवार अनुसूचित जाती आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून शुल्क घेतले जाणार नाही. यूपीएससी सीएमएस परीक्षा कॉम्प्यूटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना कॉम्प्यूटर बेस्ड मोडमध्ये २ ऑब्जेक्टीव्ह पेपर परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. प्रत्येक पेपरची परीक्षा २५० गुणांची असेल. यामध्ये उमेदवाराला परीक्षेसाठी २ तासांचा वेळ दिला जाणार आहे. या परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवाराला मुलाखत (Personality Test) फेरीसाठी बोलवले जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yutif0
via nmkadda