Advertisement

NDA 2 Exam 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA)आणि नेव्हल अकॅडमी (NA)परीक्षा (2), 2021 साठी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार ६ जुलै २०२१ पासून विंडो ओपन केली आहे. जे उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ इच्छितात, ते यूपीएससीच्या ऑफिशियल पोर्टल, upsconline.nic.in वर भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत १२ जुलै २०२१ आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की एकदा अर्ज मागे घेतल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत तो पुन्हा स्वीकारला जाणार नाही. पुढील पद्धतीने अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत पोर्टल upsconline.nic.in ला भेट द्या. यानंतर, होमपेज वर उपलब्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचा अर्ज मागे घेण्यासाठी ऑनलाइन अर्जाच्या लिंक वर क्लिक करा. आता एक नव्या टॅबवर जाल. येथे परीक्षेचा अर्ज मागे घेण्याच्या लिंकवर क्लिक करा. आता निर्देश वाचून प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन आयडी नोंदवून कंटिन्यू वर क्लिक करा. यानंतर पुढील प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकाल. नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA)आणि नेव्हल अकॅडमी (NA)परीक्षा (2) चे आयोजन १४ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. यापूर्वीच्या सूचनेनुसार, परीक्षा ५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार होती. २५ जून रोजी यूपीएससीने वार्षिक कॅलेंडर जारी केलं, त्यात या तारखेत बदल करण्यात आला होता. या परीक्षेची अधिसूचना ९ जून २०२१ रोजी जारी करण्यात आली होती. यासह अर्ज प्रकिया सुरू करण्यात आली होती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जून २०२१ होती. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण ४०० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. प्रवेशाआधी लेखी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. यात यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलावले जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xg6z61
via nmkadda