Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १५ जुलै, २०२१, जुलै १५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-15T13:47:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

World Youth Skills Day: देशात २० टक्के नोकऱ्या वर्क फ्रॉम होम होणार- रिपोर्ट Rojgar News

Advertisement
: करोनामध्ये दीड वर्षाचा कालावधी उलटला असून रोजगारावर याचा मोठा परिणाम झाला आहे. आता कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कायम केले आहे. कंपन्यांतर्फे नव्या कौशल्यास महत्व दिले जात आहे. जगभरातील २० ते ३० टक्के नोकऱ्या या कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम ()होऊ शकतात असे फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ५जी आल्यानंतर हा आकडा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. जगातील ८४ टक्के कंपन्यांनी आपल्या कामाचे डिजीटायझेशन केले आहे. पण या नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्यासाठी तरुणांना नव्या कौशल्याचे शिक्षण घेण्याची गरज आहे. वर्ल्ड यूथ स्किल डे २०२१ (World Youth Skills Day 2021)निमित्ताने हे बाब समोर आली आहे. स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स आणि संधी उपलब्ध करुन देणाऱ्या वाधवानी फाऊंडेशनच्या वाधवानी अपॉर्च्युनिटी शाखेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील दहिया कामामध्ये डिजीटायझेशन असण्याची गरज व्यक्त केली. येणाऱ्या काळात हेल्थकेअर, ब्यूटी, वेलनेस, रिटेल, बीआयएफएस किंवा ग्राहक सेवेशी संबंधित क्षेत्रांमध्ये डिजीटल रोजगार वाढणार आहे. करोना आल्यानंतर बराच काळ कौशल्य शिक्षण देणाऱ्या संस्था बंद झाल्या. पण काही महिन्यांनंतर शिक्षक आणि मुलांसाठी डिजीटल माध्यमातून समोरासमोर चर्चेचे हायब्रिड मॉडेल वाढू लागल्याचे ते म्हणाले. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या 'फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२०' मध्ये म्हटल्यानुसार,इंटरपर्सनल कौशल्यास (Interpersonal Skill)महत्व प्राप्त झाले आहे. रिटेलपासून ग्राहकांना सुविधा पुरवण्यापर्यंत तरुणांच्या बोलण्या-समजण्याची शैली, ग्राहकांना सेवा देण्याची समज आणि डिजीटल टेक्नॉलॉजीमध्ये विशेषज्ञांचे महत्व जास्त असेल. पुढच्या पाच वर्षात कंपन्यांना कौशल्य असलेल्या तरुणांची गरज असेल. जे विचार करुन समस्यांचे निवारण करण्यास प्राथमिकता देतील. फिक्की, नॉसकॉम आणि ईवायची रिपोर्ट, "फ्यूचर ऑफ जॉब्स इन इंडिया-ए 2022" पर्सपेक्टिवमध्ये म्हटल्याप्रमाणे, २०२२ पर्यंत ९ टक्के भारतीय अशा नोकऱ्यांमध्ये असतील ज्या सध्या अस्तित्वात नाहीत. यामध्ये ३७ टक्के भारतीय अशा क्षेत्रांमध्ये काम करत असतील. मॅंकिसेच्या ग्लोबल सर्व्हेमध्ये म्हटल्याप्रमाणे, कंपन्यानी आपले ग्राहक, पुरवठा साखळी आणि अंतर्गत कामाचे डिजीटायजेशनमुळे ३ ते ४ वर्षाचा वेग पकडला आहे. कंपनीच्या पोर्टफॉलिओमध्ये डिजीटल उत्पादनांची भागीदारी वेगाने वाढली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z1Uces
via nmkadda