Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २८ जुलै, २०२१, जुलै २८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-28T08:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

WR Recruitment 2021: पश्चिम रेल्वेत क्रीडा कोट्यांतर्गत विविध पदांवर भरती Rojgar News

Advertisement
WR Recruitment 2021: पश्चिम रेल्वेमध्ये वर्ष २०२१-२२ साठी क्रीडा कोट्यांतर्गत विविध पदांवर करण्यात येणार आहे. यासााठी नोटिफिकेशन जाहीर करुन सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी दिलेल्या वेळेमध्ये ऑनलाइन अर्ज पाठविणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक ४ ऑगस्ट २०२१ पासून उपलब्ध होईल. तर ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. दोन स्तराअंतर्गत एकूण २१ पदे भरली जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि पगार हा वेगळा असणार आहे. स्तर ४/५ अंतर्गत एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अनुक्रमे २५ हजार ५०० ते ८१ हजार १००/ २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० पर्यंत पगार दिला जाणार आहे. याअंतर्गत अॅथलेटिक्स (महिला), हॅंडबॉल (पुरुष) बास्केटबॉल या शाखेतून प्रत्येकी एक जागा तर हॉकी (महिला) शाखेतून २ जागा भरण्यात येणार आहेत. स्तर २/३ अंतर्गत १६ पदे भरण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० आणि २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये इतका पगार देण्यात येईल. याअंतर्गत अॅथलेटिक्स (पुरुष) शाखेतून ३ पदे, अॅथलेटिक्स (महिला) शाखेतून ३ पदे भरण्यात येणार आहेत. हॅंडबॉल (पुरुष) शाखेतून २ जागा भरण्यात येतील. तसेच क्रिकेट (महिला), हॉकी (महिला), बास्केटबॉल(पुरुष), बास्केटबॉल (महिला), डायव्हिंग (पुरुष), फ्री स्टाइल कुस्ती (पुरुष), वॉटर पोलो (पुरुष) आणि टेबल टेनिस (महिला) या शाखेतून प्रत्येकी १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. ज्या खेळाडुंनी १ एप्रिल २०१९ ते २८ जुलै २०२१ पर्यंत झालेल्या चॅम्पियनशिपमधील खेळामध्ये प्राविण्य मिळविले असून सक्रिय आहेत. ते अंतर्गत वरील पदांवर नियुक्तीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याआधी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. त्यातील सर्व बाबींची पूर्तता करुन ३ सप्टेंबर २०२१ रात्री १० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिकृत वेबसाइट https://www.rrc-wr.com वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WkrzuG
via nmkadda