Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २३, २०२१ WIB
Last Updated 2021-08-23T07:43:50Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Bank Job 2021: अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत पदवीधरांना नोकरीची संधी Rojgar News

Advertisement
Akola Bank Recruitment 2021: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये ()बंपर भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी ४ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज पाठवायचे आहे. अकोला बँकेतर्फे कनिष्ठ लिपीक (Junior Clerk) पदाच्या शंभर जागा भरण्यात येणार आहेत. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ज्युनिअर क्लर्क पदावर काम करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार याची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. यामध्ये बँकिंग आणि सहकार, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी यावर आधारित प्रश्नांचा समावेश असणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांकडे अडीच तासांचा वेळ असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जाणार आहेत. ही परीक्षेचे माध्यम इंग्रजी असणार आहे. थेट मुलाखत या पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी ७५ टक्के तर मुलाखतीसाठी २५ टक्के गुण देण्यात येणार आहेत. ऑनलाइन परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट पाहणे गरजेचे आहे. दोन्ही परीक्षेत मिळून सर्वाधित गुण असलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शैक्षणिक आर्हता नोटिफिकेशननुसार कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. उमेदवारांकडे एमएससीआयटी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेतून किमान ९० दिवस पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. अर्ज शुल्क अर्जासोबत उमेदवारांना हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागणार आहे. यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत वेळ दिला जाणार आहे. पगार या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातील १० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. तर प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर २५ हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XSEYex
via nmkadda