Advertisement
CA Exams 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, (ICAI) ने फायनल आणि इंटरमीडिएट कोर्सेससाठी होणाऱ्या CA परीक्षा २०२१ फायनल अटेम्प्टला नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाइट .org वर नोटीस जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत सूचनेनुसार, करोनाच्या प्रसारामुळे विद्यार्थ्यांना झालेला त्रास दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मे २०२१ ची परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही तारीख वाढविण्यात आली आहे. फायनल आणि इंटरमीडिएट कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. नोव्हेंबर २०२१ ला होणारी परीक्षा जुन्या अभ्यासक्रमांतर्गत परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेवटचा प्रयत्न असेल. यापुढे अशी मुदतवाढ दिली जाणार नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत जुनी अभ्यासक्रम योजना कायमची बंद केली जाईल. दरम्यान, संस्थेने डिसेंबरच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ICAI ने IRM, चार्टर्ड अकाउंटंट इंटरमीडिएट, फायनल आणि फाउंडेशन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ICAI च्या अधिकृत वेबसाइटवर icai.org. परीक्षांचे वेळापत्रक पाहता येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक ICAI CA फाउंडेशन (ICAI Foundation) कोर्स परीक्षा - १३ डिसेंबर, १५, १७, १९ डिसेंबर २०२१ ऑप्ट आउट विद्यार्थ्यांसाठी परीक्षा- ६ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२१ सीए इंटरमीडिएट परीक्षा नवी योजना - ६ ते २० डिसेंबर २०२१ ऑप्ट आऊट विद्यार्थ्यांसाठी ICAI CA अंतिम अभ्यासक्रम परीक्षा - ५ ते १९ डिसेंबर २०२१ सीए फायनल कोर्स परीक्षा ग्रुप -१ (केवळ ऑप्ट आऊट विद्यार्थ्यांसाठी) - ५, ७, ९ आणि ११ डिसेंबर २०२१ सीए फायनल कोर्स परीक्षा ग्रुप -2 जुन्या योजनेअंतर्गत (केवळ ऑप्ट आऊट विद्यार्थ्यांसाठी) - १३ डिसेंबर, १५, १७ आणि १९ डिसेंबर २०२१ नवीन योजनेअंतर्गत, सीए अंतिम अभ्यासक्रम परीक्षा (ग्रुप १) - ५, ७, ९ आणि ११ डिसेंबर २०२१ नवीन योजनेअंतर्गत, सीए अंतिम अभ्यासक्रम परीक्षा (ग्रुप २) -१३, १५, १७ आणि १९ डिसेंबर २०२१
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Wbk1ur
via nmkadda