Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २७, २०२१ WIB
Last Updated 2021-08-27T08:44:25Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Career Guidance: यशस्वी करिअर बनविण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा Rojgar News

Advertisement
Guidance: पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात आता करिअरमध्ये यश कसे मिळवायचे ? हा प्रश्न फिरत राहतो. सर्वच क्षेत्रात आता स्पर्धा वाढत चालली आहे. करिअरमध्ये तुम्हाला रोज नवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. यामुळे मिळालेल्या नोकरीत अधिक चांगले करणे आणि करिअरमध्ये पुढे जाणे हे खूप महत्वाचे आहे. आपल्याला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नोकरीत उत्कृष्ट कामगिरीसोबतच काही ध्येय देखील ठेवावी लागतील. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते याची माहिती घेऊया. पुढाकार घ्या सहसा तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्ही वरिष्ठांकडून सूचना येण्याची वाट पाहता. पण आजच्या स्पर्धात्मक युगाच्या दृष्टीने हे प्रत्येकवेळेस योग्य असेलच असे नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामात जोखीम घ्यायला शिकत नाही तोपर्यंत तुमचे काम निदर्शनात येणार नाही. त्यामुळे सूचनांच्या पलीकडे नवीन कल्पना घेऊन नवीन पुढाकार घ्यायला शिका आणि स्वतःला सिद्ध करा. स्वतःचे मूल्यांकन करा करिअरमधील यशाचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे आपल्या कामाचे स्वतःच मूल्यांकन करणे. वार्षिक मूल्यांकनापेक्षा किंवा इतरांद्वारे स्वत: चे मूल्यांकन करुन घेण्यापेक्षा प्रत्येक तीन-सहा महिन्यांनी आपल्या स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे चांगले. हे तुम्हाला तुमचा कमकुवतपणा ओळखण्यास आणि त्यांना तुमची ताकद बनवण्यासाठी मदत करेल. नेहमी शिकण्यासाठी तयार रहा आपल्या कामामध्ये आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी नेहमी तयार रहा. तुम्ही कोणत्या महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे हे महत्त्वाचे नाही. तुम्ही तुमच्या कामात किती सक्षम आहात आणि त्यामध्ये अधिक चांगले करण्यासाठी तुम्ही कोणत्या नवीन पद्धती अवलंबता हे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी नेहमी तयार राहा. गरजा समजून घ्या आपले काम आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला आपल्या बॉस आणि टीमच्या गरजा समजून घेणे आवश्यक आहे. जर मी माझ्या बॉसच्या जागी असतो तर मी पुढचे पाऊल कसे टाकले असते या विचाराने तुम्ही नेहमी काम केले पाहिजे. यामुळे तुमच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास येईल तसेच करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत होईल. आपली बाजू नीट मांडा कोणत्याही कर्मचाऱ्याने आपल्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आपला मुद्दा योग्य मार्गाने ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून, जेव्हा एखादे काम पूर्ण होते, तेव्हा ते आपल्या व्यवस्थापनाला सांगा आणि पुढील कामाबद्दल बोला. यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. बोलण्याऐवजी प्रात्यक्षिक करा शब्दांपेक्षा काम जास्त महत्वाचे आहे. म्हणून ही गोष्ट तुमच्या कामाच्या ठिकाणीही लावा. तिथे बोलण्यापेक्षा त्या गोष्टी करणे चांगले होईल. यामुळे तुमच्यावरील व्यवस्थापनाचा विश्वास अधिक वाढेल. समस्यावरील उपाय सांगा सर्वांनाच काम करताना समस्या येतात. पण जर तुम्ही सतत फक्त समस्यांवरच बोलत असाल तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणून शक्य होईल तितकं, समस्यांच्या निराकरणाबद्दल विचार करा आणि निराकरणाबद्दल बोला. यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप फायदा होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BfTtar
via nmkadda