Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-02T06:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 10th Result 2021: डिजिलॉकरवर असा तपासा सीबीएसई दहावीचा निकाल Rojgar News

Advertisement
2021, CBSE Matric Result 2021: सीबीएसई दहावी रिझल्ट २०२१ ची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) लवकरच २०२१ ची तारीख जाहीर करु शकतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) तर्फे आपली अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. विद्यार्थी आपला रोल नंबर आणि शाळा कोड सारख्या महत्वाच्या डिटेल्स टाकून रिझल्ट तपासू शकतात. रिझल्ट जाहीर झाल्यानंतर एकाचवेळी लाखो विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाइटवर जातात. यामुळे वेबसाइट डाऊन किंवा क्रॅश होते. त्यामुळे आता रिझल्ट पाहण्यासाठी वेबसाइटशिवाय अनेक पर्याय देण्यात आले आहेत. त्यामध्ये हा एक महत्वाचा पर्याय आहे. डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवर सीबीएसई सर्टिफिकेट आणि मार्कशिट उपलब्ध होईल. विद्यार्थी आपल्या स्मार्टफोनवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डिजिलॉकर अॅप डाऊनलोड करु शकता किंवा डिजिलॉकरच्या वेबसाइटवर जाऊन निकाल तपासू शकता. डिजिलॉकरच्या माध्यमातून निकाल कसा तपासायचा? हे जाणून घेऊया. स्वत:चे डिजिलॉकर अकाऊंट तयार करा Digilocker.gov.in वर रजिस्टर करण्यासाठी नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा. आपले नाव, जन्म तारीख आणि इतर वैयक्तिक माहिती भरा. आपला मोबाइल नंबर आणि ६ अकांचा सिक्योरीटी पिन नंबर सेट करा. आता आपला ईमेल आयडी, आधार नंबर टाका आणि सबमिट करा on DigiLocker: रिझल्ट असा तपासा स्टेप १- सर्वात आधी डिजिलॉकरची अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in वर जा स्टेप २- होमपेजवर एज्युकेशन सेक्शनमध्ये सीबीएसईवर क्लिक करा स्टेप ३ - दहावी क्लास मार्कशीट किंवा दहावी पासिंग सर्टिफिकेटवर क्लिक करा स्टेप ४ - आता रजिस्टर मोबाइलच्या मदतीने सीबीएसई दहावी रिझल्ट २०२१ तपासा स्टेप ५ - रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढा १८ लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार यावर्षी सीबीएसई दहावीच्या साधारण १८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सीबीएसई दहावी परीक्षा ४ मे ते ७ जून २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. पण करोना प्रादुर्भावामुळे ती रद्द करण्यात आली. त्यानंतर आता सीबीएसई बोर्डातर्फे अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A2Zruy
via nmkadda