Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-08-05T12:43:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 10th Result: करोनामुळे आई-वडील गमावल्यानंतर न डगमगता वनिशाने दहावीत केले टॉप Rojgar News

Advertisement
10th Result: भोपाळच्या वनिशा पाठकने अशी कामगिरी केली आहे ज्यामुळे प्रत्येक आई-वडीलांना अभिमान वाटेल. दुर्देवाने तिचे आई-वडील हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी या जगात नाहीत. पण सर्व स्तरातून तिचे कौतुक होतंय. करोना काळात आई वडील गमावल्यानंतर वनिशा यातून बाहेर येऊ शकेल का याची भीती सर्वांना वाटत होती. पण वनिशा केवळ पासच झाली नाही तर तिने सर्वाधिक गुण मिळवून शहरात पहिला येण्याचा मान मिळवला. वनिशाला सीबीएसई दहावीच्या परीक्षेमध्ये ९९.८ टक्के गुण मिळाले. दोन अन्य विद्यार्थ्यांसह ती शहरातील टॉपर आहे. तिला इंग्रजी, संस्कृत, विज्ञान, सोशल सायन्स या पेपरमध्ये १०० पैकी ९७ गुण मिळाले आहेत. आनंदाच्या क्षणी आईवडील सोबत नाहीत दहावीत ९९.८ टक्के गुण मिळणे हा कोणत्याही विद्यार्थ्यासाठी आनंदाचा क्षण असतो. पण १६ वर्षाच्या या मुलीसाठी तसं नाहीय. दोन महिन्यांपुर्वी तिने आपले आईवडील गमावले. पण वनिशाने आपल्या आईवडीलांना दिलेले वचन पूर्ण केले. पण आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी तिचे आईवडील सोबत नाहीत. दोन महिने आधी आई-वडील गमावल्यानंतर वनिशा शहरातील टॉपर असेल असे कोणाला वाटले नव्हते. ती आपल्या छोट्या भावाला घेऊन संघर्ष करत होती. माझ्या आई-वडीलांच्या आठवणीने मला प्रेरणा मिळाली असे वनिशा म्हणाली. वनिशा आता भावासाठी मोठी प्रेरणा बनली आहे. मी माझ्या ताईसारखा बनेन असे उदाहरण त्याच्यासमोर मला ठेवायचे होते असेही ती म्हणाली. आई-वडीलांची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द वनिशाचे वडील जितेंद्र कुमार पाठक हे एक अर्थ सल्लागार तर आई डॉ. सीमा पाठक या सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. वनिशाने या दोघांना रुग्णालयात जाताना अखेरचे पाहिले होते. रुग्णालयात वनिशाच्या आईचे निधन ४ मेला आणि वडीलाचे निधन १५ मेला झाले. आई-वडीलांची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द वनिशाने ठेवली. मला आता शंभर टक्के आणायचे आहेत, दीदीपेक्षाही जास्त गुण मिळवायचे आहेत असे वनिशाच्या भावाने सांगितले. मला क्रिकेट खेळायलाही आवडते असेही तो म्हणाले. वनिशा आता आपल्या भावासोबत मामा डॉ. अशोक कुमार यांच्यासोबत राहते. ते भोपाळच्या गव्हर्नमेंट एमवीएम कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. वनिशा फायटर आहे. आई-वडीलांच्या निधनानंतरही तिने डगमगून न जाता हे यश मिळविले आहे असे डॉ.अशोक कुमार यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37jWObN
via nmkadda