Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २४, २०२१ WIB
Last Updated 2021-08-24T07:43:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE बोर्डाची परीक्षा २५ ऑगस्टपासून, महत्वाचे निर्देश जाहीर Rojgar News

Advertisement
exams: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा २०२१ ही २५ ऑगस्ट २०२१ पासून होणार आहे. सीबीएसईच्या खासगी विद्यार्थ्यांसाठी आणि जुलै २०२१ मध्ये जाहीर झालेल्या निकालावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षा होत आहे. प्रवेशपत्र संबंधित शाळेतून घ्यावे लागणार सीबीएसई बोर्डाने २० ऑगस्ट २०२१ रोजी ऑफलाइन परीक्षेला बसलेल्या खासगी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र जारी केले होते. नियमित विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेतून प्रवेशपत्रे घ्यावी लागतील. प्रवेशपत्र हे परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे हे ऑफलाइन परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी लक्षात घ्यावे. परीक्षा २०२१ ही १५ सप्टेंबर २०२१ रोजी संपणार आहे. दहावीच्या परीक्षेत गणिताचा शेवटचा पेपर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा माहिती तंत्रज्ञानाच्या पेपरने सुरु होणार असून गणिताचा पेपर शेवटचा असणार आहे. दुसरीकडे बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा इंग्रजीसह मूलभूत विषय म्हणून सुरू होणार असून होम सायन्सचा शेवटचा पेपर असणार आहे. परीक्षेत अनुपस्थित असाल तर? सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ ऑफलाइन माध्यमातून करोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करून घेतली जाईल. जर नोंदणीकृत नियमित उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहीले तर अंतर्गत मूल्यमापन धोरणानुसार मिळालेले गुण अंतिम मानले जाणार आहेत. CBSE Admit Card 2021: दहावी आणि बारावी परीक्षेसाठी प्रवेश पत्र असे करा डाऊनलोड सर्वात आधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या. वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या 'खासगी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र' सेक्शनमध्ये थेट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर CBSE प्रायव्हेट आणि रेग्यूलर उमेदवार प्रवेशपत्र २०२१ लिंकवर क्लिक करा. क्रेडेंशियल एंटर करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी CBSE प्रायव्हेट आणि रेग्यूलर विद्यार्थी प्रवेशपत्र २०२१ ची प्रिंट घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yaV0g3
via nmkadda