CLAT 2021 च्या दुसऱ्या काऊन्सिलिंग सत्रासाठी यादी जाहीर, 'येथे' तपासा Rojgar News

CLAT 2021 च्या दुसऱ्या काऊन्सिलिंग सत्रासाठी यादी जाहीर, 'येथे' तपासा Rojgar News

second seat allotment list: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कंसोर्टियमने सोमवारी दुसऱ्या काऊन्सिलिंग सत्रासाठी CLAT 2021 सीट्सची यादी जाहीर केली आहे. देशभरामध्ये २२ लॉ युनिव्हर्सिटीमध्ये यूजी आणि पीजी कोर्ससाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार CLAT परीक्षेसाठी उपस्थित होते ते अधिकृत वेबसाइटवर consortiumofnlus.ac.in वर आपली यादी तपासू शकतात. निर्धारित केलेला सीट नंबर स्वीकारणाऱ्या किंवा अपग्रेड करण्यासाठी किंवा CLAT प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी १० ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ असणार आहे. कंसोर्टियमने उमेदवारांना १० ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत फीस भरण्याचे निर्देश दिले आहेत. CLAT लॉगिन खात्यामध्ये डॉक्यूमेंट अपलोड करण्यासाठी आणि पेमेंटची माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे. अपग्रेडेशनचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांनी निर्धारित केलेल्या विद्यापीठाचे अपेक्षित शुल्क भरणे गरजेचे आहे. त्यानंतर कंसोर्टियमच्या वेबसाइटवर कागदपत्र अपलोड करावे. ज्या उमेदवारांनी संबंधित शुल्क भरले असेल त्यांनाच वेबसाइटवर कागदपत्र अपलोड करता येणार आहेत. ज्या उमेदवाराला सीट नंबर देण्यात आला आणि त्याने फीस भरली नाही किंवा कागदपत्र अपलोड केली नाहीत तो प्रवेशासाठी पात्र नसेल. सीट ब्लॉक करण्यासाठी उमेदवारांना ५० हजार रुपयांचे पेमेंट करावे लागेल. ज्या उमेदवारांनी दुसऱ्या यादीमध्ये सीट निवडली नसेल त्यांना पुढच्या यादीची वाट पाहण्याचे आवाहन करण्यात आले. तिसरी १३ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CBpNWU
via nmkadda

0 Response to "CLAT 2021 च्या दुसऱ्या काऊन्सिलिंग सत्रासाठी यादी जाहीर, 'येथे' तपासा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel