Advertisement
Recruitment 2021: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( Electronics Corporation of India Limited, ECIL)मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत टेक्निकल ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. प्रोजेक्टची आवश्यकता आणि उमेदवाराची कामगिरी पाहून हा कालावधी वाढविला जाऊ शकतो. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ECIL च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकतात. २५ ऑगस्ट ही फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख आहे. रिक्त पदांचा तपशील टेक्निकल ऑफिसर ३/TCD- ५ पदे टेक्निकल ऑफिसर १/MCD- २ पदे टेक्निकल ऑफिसर २/EDP-५ पदे टेक्निकल ऑफिसर ३/TCD- १ पदं या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता किंवा भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी,उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. पगार निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा २३ हजार पगार दिला जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37VKv5F
via nmkadda