Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ११, २०२१ WIB
Last Updated 2021-08-11T09:43:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

'विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्वावलंबी बनवणे हा EMC चा हेतू' Rojgar News

Advertisement
Delhi School Programe: दिल्लीच्या शाळांमध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजक मानसिकता अभ्यासक्रम ( Delhi government's Entrepreneurship Mindset Curriculum, EMC)सुरु करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्वावलंबी बनविणे हा यामागचा हेतू आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया ()यांनी ईएमसीच्या उद्योजक संवादामध्ये याबद्दल माहिती दिली. मुलांमध्ये उद्योजकता कौशल्ये विकसित होतील यासाठी आम्ही नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजक मानसिकता अभ्यासक्रम सुरू केला आहे असे मनीष सिसोदीया यावेळी म्हणाले. इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीड मनी प्रोजेक्ट हा ईएमसी अंतर्गत सर्वात महत्वाचा घटक आहे. सीड मनी प्रोजेक्ट हा आमच्या मुलांमध्ये व्यवसाय कौशल्य विकसित करण्यात आणि देशासाठी योगदान देणारे तरुण उद्योजक बनविण्यात मदत करेल.मुलांना त्यांच्यातील कलागुण ओळखण्यात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. विविध क्षेत्रांतील उद्योजकांना दिल्ली सरकारी शाळकरी मुलांशी संवाद साधणे आणि नवीन व्यवसाय उभारताना त्यातील आव्हाने समजून घेणे हे दिल्ली सरकारच्या उद्योजक मानसिकता अभ्यासक्रमांतर्गत लाईव्ह उद्योजकता परस्परसंवादातून होत असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपुर्वीच उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदीया यांनी शाळांमध्ये सुरु असलेल्या उद्योजक मानसिकता अभ्यासक्रमाच्या (ईएमसी) प्रगतीचा आढावा घेतला होता. त्याचबरोबर, ईएमसीशी संबंधित टीचिंग-लर्निंग साधने सर्व शालेय प्रमुख, शिक्षक आणि ईएमसी समन्वयकांपर्यंत चांगल्या रितीने पोहोचविण्यासाठी अॅप्लीकेशन सुरु केले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U8xNx3
via nmkadda