Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २७, २०२१ WIB
Last Updated 2021-08-27T09:55:23Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

FYJC First Merit List 2021: मुंबई MMR मध्ये पहिल्या यादीत १,१७,८८३ विद्यार्थ्यांना प्रवेश Rojgar News

Advertisement
मुंबईसह राज्याच्या पाच महापालिका क्षेत्रांत सुरू असलेल्या प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी () शुक्रवारी सकाळी जाहीर झाली. यात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात एकूण एक लाख ९१ हजार ९३ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले आहेत. हे प्रमाण ६१.६९ टक्के इतके आहे. विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या ज्युनिअर कॉलेजची माहिती देणारा एसएमएसही पाठवण्यात आला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीचा सारांश पुढीलप्रमाणे (मुंबई विभाग)- एकूण उपलब्ध जागा - १,९७,१७१ पहिल्या गुणवत्ता यादीसाठी एकूण प्राप्त अर्ज - १,९१,०९३ पहिल्या गुणवत्ता यादीतील एकूण अलॉटमेंट - १,१७,८८३ पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - ४८,७८८ दुसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - १८,८०४ तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - १२,७९९ या यादीत मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश निश्चित करण्यासाठी २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६ वाजेपर्यंतचा अवधी विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. दुसरी फेरी साधारणपणे ३१ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहे. त्याचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांनी पुढील गोष्टी ध्यानात घ्याव्यात - - विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगइनमध्ये जाऊन अलॉट झालेले ज्युनिअर कॉलेज तपासून घ्यावे. - पहिल्या पसंतीक्रमाचे ज्युनिअर कॉलेज अलॉट झाले असल्यास वेळापत्रकात नमूद केल्यानुसार आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा. - जर विद्यार्थ्याला २ ते १० क्रमांकामधील ज्युनिअर कॉलेज अलॉट झाले असेल आणि त्याला त्या कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल, तर त्याने वेळापत्रकात नमूद केल्यानुसार आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा. अन्यथा पुढील फेरीच्या सूचना प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जातील त्यानुसार कार्यवाही करावी. - अलॉट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लॉगइनमध्ये जाऊन संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आपली सहमती Proceed for admission या ऑप्शनवर क्लिक करून ऑनलाइन नोंदवावी. - विद्यार्थ्याने कोणत्याही कोट्यातून (केंद्रीय ऑनलाइन/ अल्पसंख्याक / इनहाऊस / व्यवस्थापन कोटा) एकदा प्रवेश निश्चित केल्यास तो पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जातो. पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट झाले आहे का ते पुढील पद्धतीने पाहता येईल - - सर्वात आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://ift.tt/2WnqAHp वर जा. - आपला आयडी पासवर्ड देऊन लॉग इन करा. - लॉग इन केल्यावर स्क्रीनवर डिटेल्स येतात आपले - डॅश बोर्डवर चेक अलॉटेड कॉलेज पर्यायावर क्लिक करा. - कॉलेज अलॉट झालं असेल तर त्याचं नाव येथे दिसेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zlZ5PS
via nmkadda