Advertisement
IBPS Score Card 2021: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection or IBPS) ने सीआरपी-आरआरबी एक्स ऑफिसर प्राथमिक परीक्षा २०२१ (IBPS RRB PO Prelims Result 2021) चा निकाल जाहीर केला आहे. IBPS ने ३० ऑगस्ट २०२१ रोजी ऑफिसर स्केल १ प्रीलिम्स ला बसलेल्या उमेदवारांचे गुण ऑनलाईन जाहीर केले आहेत. ही परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाईटibps.in वर किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर जाऊन निकाल तपासू शकतात. उमेदवारांना २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत गुणपत्रिका डाउनलोड करता येऊ शकते. RRB PO Score Card 2021: असे पहा स्कोअरकार्ड उमेदवारांना त्यांचे सीआरपी-आरआरबी एक्स ऑफिसर स्केल १ प्रीलिम्स स्कोअर कार्ड ऑनलाईन पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जा, होमपेजवर दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करा. नवीन पेजवर त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरावी. लॉगिन केल्यानंतर उमेदवारांना त्यांची गुणपत्रिका पाहता येईल भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढून ठेवा आयबीपीएस सीआरपी-आरआरबी-एक्स ऑफिसर स्केल १ प्राथमिक परीक्षा केवळ पात्रता परीक्षा आहे. IBPS ने परीक्षेचे गुण निश्चित करण्यासाठी नियम देखील जाहीर केले आहेत. उमेदवार बातमीखाली दिलेल्या लिंकवर गुण तपासू शकतात. सीआरपी-आरआरबी-एक्स ऑफिसर स्केल १ प्राथमिक परीक्षेत पात्र उमेदवार आता ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ऑनलाइन आयबीपीएस सीआरपी-आरआरबी-एक्स ऑफिसर स्केल I मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र आहेत. देशभरातील विविध प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) आणि अधिकारी (स्केल १,२ आणि ३) च्या १२ हजारहून अधिक पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन निवड प्रक्रिया पार पाडत आहे. या पदांसाठीचे २८ जून २०२१ पर्यंत अर्ज करण्यात येत होते. IBPS RRB PO भरती २०२१ आयबीपीएस आरआरबी पीओ (IBPS RRB PO) ही तीन टप्प्यातील भरती प्रक्रिया आहे. पात्र उमेदवारांना भारताच्या प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये प्रोबेशनरी अधिकारी (PO) म्हणून भरती केले जाईल. भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर IBPS RRB कट-ऑफ पूर्ण करणे अनिवार्य आहे. आयबीपीएस प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) गट 'ए' -ऑफिसर्स (स्केल- I, II आणि III) च्या पदांसाठी भरती होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jvbuvj
via nmkadda