Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-08-06T07:43:15Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICSI CS admit card 2021: आयसीएसआय सीएस फाऊंडेशन परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर Rojgar News

Advertisement
2021: सीएस फाऊंडेशन परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडीया ( Institute of Company Secretaries of India,ICSI)ने आपल्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर ICSI CS परीक्षा २०२१ साठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी जून २०२१ मध्ये सीएस फाऊंडेशन परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात. आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करुन प्रवेश पत्र डाऊनलोड करता येऊ शकते. बातमीमध्ये देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता. सीएस फाऊंडेशन परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी उमेदवाराला आयसीएसआयची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जावे लागेल. यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या सीएस फाऊंडेशन प्रवेश पत्र २०२१ लिंकवर क्लिक करा. प्रवेश पत्र काळजीपूर्वक तपासून घ्या. डाऊनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा. ही परीक्षा पूर्ण देशामध्ये १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणार आहे. सीएस फाऊंडेशन प्रोग्राम परीक्षा केंद्रात किंवा कॉम्प्युटर माध्यमातून होऊ शकते. उमेदवार परीक्षाकेंद्रातून रिमोट प्रॉक्टेड मोड किंवा सीबीएसई या दोन पर्यायापैकी निवड करु शकतात. या संदर्भातील माहिती उमेदवारांना त्यांच्या ईमेल आणि मेसेजद्वारे पाठविण्यात येईल. ज्या उमेदवारांकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची सुविधा नाही ते देशभरातील परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देऊ शकतात. यासाठी देशातील साधारण ६१ शहरांमध्ये परीक्षा केंद्र बनविण्यात आले आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर परीक्षेसंदर्भातील अधिक अपडेट मिळू शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xvF6MS
via nmkadda