ICSI CS Foundation Exam 2021: सीएस फाऊंडेशन परीक्षेचे नोटिफिकेशन जारी Rojgar News

ICSI CS Foundation Exam 2021: सीएस फाऊंडेशन परीक्षेचे नोटिफिकेशन जारी Rojgar News

CS Foundation Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of Company Secretaries of India, ICSI) ने कंपनी सेक्रेटरी, सीएस फाऊंडेशन एक्झाम 2021( Company Secretary, 2021) परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार ही परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा रिमोट प्रॉक्टेड मोडच्या माध्यमातून ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे. आयसीएसआय सीएस फाउंडेशन परीक्षा २०२१ साठी उपस्थित होणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट - icsi.edu वर विस्तृत शेड्युल नोटीस पाहू शकतात. विस्तृत नोटिफिकेशन नुसार ही परीक्षा १३ आणि १४ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना कुठूनही रिमोट प्रॉक्टेड मोडद्वारे परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आली आहे. म्हणजेच ते घरून किंवा जवळच्या कोणत्याही सुविधा असलेल्या ठिकाणाहून परीक्षा देऊ शकतात. उमेदवारांनी लक्ष द्यावे की परीक्षेच्या दरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून चांगला इंटरनेट स्पीड असणारा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करावा. नोटिसनुसार, उमेदवारांना परीक्षेसाठी दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागेल. यानुसार, जर परीक्षार्थींना वाटल्यात ते रिमोट प्रॉक्टेड मोड किंवा परीक्षा केंद्र यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. उमेदवारांना एक ईमेल किंवा एसएमएस पाठवला जाईल, यात विस्तृत निर्देश असतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3imXIul
via nmkadda

0 Response to "ICSI CS Foundation Exam 2021: सीएस फाऊंडेशन परीक्षेचे नोटिफिकेशन जारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel