Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २७, २०२१ WIB
Last Updated 2021-08-27T12:43:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IDBI मध्ये ९२० रिक्त जागांसाठी ५ सप्टेंबरला परीक्षा; प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

Advertisement
IDBI Bank : जर तुम्ही IDBI बँकेत ९२० एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आयडीबीआय बँकेच्या एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षेला उपस्थित राहण्याऱ्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार परीक्षेच्या तारखेपर्यंत प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. आयडीबीआय बँक एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षा ५ सप्टेंबर २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच बँकेने परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना माहिती पुस्तिकेद्वारे आवश्यक सूचनाही जाहीर केल्या आहेत. IDBI बँक एग्झिक्युटिव्ह भरती परीक्षेसाठी सूचना एक्झिक्युटिव्ह (ऑन कॉन्ट्रॅक्ट) भरती परीक्षा आयडीबीआय बँकेद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी मॉडेल क्वेश्चन उमेदवार माहिती पुस्तिकेतून तपासू शकतात. परीक्षेत एकूण १५० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक योग्य उत्तरला १ गुण असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण कापले जातील. परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची भाषा इंग्रजी आणि हिंदी असेल. (इंग्रजी भाषेतील प्रश्न वगळता) परीक्षेचा एकूण कालावधी ९० मिनिटे आहे. परीक्षेच्या वेळी स्क्रीनच्या वर उजव्या कोपऱ्यात काउंटडाउन टाइमर सुरु राहील. जेणेकरून उमेदवारांना परीक्षेत उरलेला वेळ कळेल. परीक्षा कालावधी संपल्यानंतर उमेदवार कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाहीत किंवा त्यांची उत्तरे तपासू शकणार नाहीत. म्हणून, उत्तर सबमिट करण्यापूर्वी, त्याचवेळी तपासा. मुदतीच्या शेवटी जरी उमेदवाराने सबमिट बटणावर क्लिक केले नसले तरी त्याची उत्तरे कॉम्प्युटर सिस्टिमद्वारे आपोआप सेव्ह केली जातील. निवड झालेल्या उमेदवारास पहिल्या वर्षी २९ हजार रुपये इतका पगार मिळेल. दुसऱ्यावर्षी ३१ हजार इतका पगार तर तिसऱ्या ३४ हजार दरमहा इतका पगार दिला जाईल. या ३ वर्षानंतर उमेदवार आयडीबीआय बॅंकेत असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी निवडला जाईल. कार्यकाळादरम्यान उमेदवाराला आयडीबीआयच्या कोणत्याही ऑफिस, ब्रॅंचमध्ये बॅंकेच्या गरजेनुसार पाठवण्यात येईल. तसेच कॉन्ट्रॅक्टवर कामाला राहीलेले उमेदवार कोणत्याही ग्रॅच्युटी आणि प्रॉविडंट फंडसाठी पात्र नसतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jiQRma
via nmkadda