Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-02T11:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOU June TEE 2021: जून टर्म अॅण्ड एक्झाम २०२१ उद्यापासून, या पाच पॉइंट्सकडे लक्ष द्या! Rojgar News

Advertisement
IGNOU : इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठ (IGNOU) ने जून टर्म अॅण्ड एक्झाम २०२१ (TEE 2021) चे आयोजन ३ ऑगस्ट २०२१ पासून केले जाणार आहे. प्रत्येक दिवसाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. परीक्षा देणाऱ्यांसाठी हॉलतिकिट आधीच जाहीर करण्यात आले आहे. तसेच इग्नूने परीक्षार्थींसाठी महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. उमेदवारांनी लक्षात ठेवा या पाच गोष्टी १) सर्व उमेदवारांना लक्षात ठेवावे लागेल की, परीक्षेत सहभागी होण्यासाठी त्यांना आपले हॉलतिकिट सोबत न्यावे लागेल. हॉलतिकिट नसेल तर परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही. तसेच हॉलतिकिटवर देण्यात आलेल्या निर्देशांचे पूर्णपणे पालन करणे अनिवार्य असणार आहे. २) करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी निर्देशांचे पालन करणे आणि सोशल डिस्टन्सिंगसोबत स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. ३) करोना स्थिती किंवा इतर कोणत्याही कारणामुळे परीक्षा केंद्रात शेवटच्या क्षणी काही बदल होण्याची शक्यता आहे. अशावेळी विद्यापीठातर्फे योग्य त्या उपाययोजना देखील करण्यात येतील. याचा परिणाम होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या केंद्रांसोबत संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ४)अभ्यासक्रमात निवडलेल्या भाषेतून प्रश्नपत्रिकेतील उत्तर द्यावे लागणार आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील उत्तरांचे मूल्यांकन केले जाणार नाही. तसेच कोणतीही सूचना न देताा ते रद्द केले जाईल. ५) सर्व उमेदवारांना परीक्षा सुरु होण्याच्या किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. प्रश्नपत्रिकेवर प्रत्येक परीक्षेच्या वेळेचा उल्लेख केला जाईल. इग्नूने जुलै सत्र२०२१ साठी पुनरनोंदणी करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. उमेदवार आता १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुनरनोंदणी करु शकतात. यासाठी उमेदवारांना इग्नूची अधिकृत वेबसाइटला ignou.ac.in भेट द्यावी लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37cdFgq
via nmkadda