Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २४, २०२१ WIB
Last Updated 2021-08-24T12:43:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Internship Day 2021: AICTE तर्फे ६.१ लाख प्रशिक्षर्णार्थीना संधी Rojgar News

Advertisement
AICTE 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोहिमेचा भाग म्हणून एआयसीटीईतर्फे २५ ऑगस्ट २०२१ रोजी इंटर्नशिप दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने () दिलेल्या माहितीनुसार, इंटर्नशिप दिवस २०२१ च्या निमित्ताने ६.१ लाख इंटर्नशिप संधी खुल्या केल्या जाणार आहेत. एआयसीटीईची अधिकृत वेबसाइट Aicte-india.org वर सहा लाखांहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध असतील. हा कार्यक्रम AICTE वर NEAT सेलच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर २५ ऑगस्टला दुपारी २ ते ४.३० वाजेपर्यंत पाहता येणार आहे. या मोहिमेअंतर्गत २०२५ पर्यंत १ कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी दिल्या जाणार आहेत. विद्यार्थी आणि कंपनी दोघांसाठी इंटर्नशिप पोर्टल च्या इंटर्नशिप पोर्टलवर देशभरातील विविध राज्ये आणि शहरांमधील विद्यार्थी संधीसाठी अर्ज करु शकतात.विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या इंटर्नशिपच्या संधी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी अर्ज करण्यासाठी राज्यांनुसार वेगवेगळ्या शहरांची यादी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शहराच्या लिंकवर क्लिक करता येणार आहे. अशा प्रकारे या पोर्टलची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रथम इंटर्नशिप पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यासाठी त्यांना त्यांच्या कॉलेज किंवा विद्यापीठाने जाहीर केलेला नावनोंदणी क्रमांक, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल. त्याचप्रमाणे सरकारी आणि खासगी कंपन्या किंवा संस्था देखील पोर्टलवर नोंदणी करून त्यांच्या इंटर्नशिपच्या संधी पोर्टलवर पोस्ट करू शकतील. कॉर्पोरेट श्रेणीतील इंटर्नशिपसाठी अर्ज एआयसीटीईच्या इंटर्नशिप पोर्टलवर शहरनुसार रँकसह विविध श्रेणीतील इंटर्नशिपचा डेटाबेस देखील जोडला गेला आहे. यामध्ये NHAI, NCDC, CDAC IEEE, सोशल जस्टिस अॅण्ड एम्पॉरमेंटर यांचा सहभााग आहे. कॉर्पोरेट कॅटेगरीमध्ये विविध इंटर्नशिप संधीसाठी अर्ज केले जाऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zhMJIz
via nmkadda