Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-08-07T11:44:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MHT CET 2021 यंदा कमी विद्यार्थ्यांची नोंदणी; प्रवेशांना जोरदार झटका Rojgar News

Advertisement
पुणे : राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालात ९९.६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने, यंदा व्यावसायिकसह इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी पसंती देतील, अशी चर्चा होती. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चरच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटीसाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा एक ते सव्वा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वाढणारे शुल्क आणि करोनामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती खालवल्याने नोंदणी कमी झाल्याची शक्यता आहे. राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते. या सीईटीसाठी ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेली नोंदणी काही दिवसांपूर्वी संपली आहे. सप्टेंबर महिन्यात ४ ते १० सप्टेंबर आणि १४ ते २० सप्टेंबर अशा दोन सत्रांत ही सीईटी होणार आहे. गेल्या वर्षी या सीईटीसाठी पाच लाख ४२ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. मात्र, यंदा या सीईटीसाठी नोंदणी चार लाखांच्या आसपास झाली आहे. त्यामुळे नोंदणी कमी झाल्याने, प्रवेश कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इंजिनीअरिंगच्या तुलनेत फार्मसी आणि कृषीच्या पदवी अभ्याक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल असतो. त्यामुळे नोंदणी कमी झाल्याचा फटका इंजिनीअरिंग प्रवेशांना अधिक बसणार आहे. यंदा नोंदणी न करणारे विद्यार्थी सायन्स शाखेतील पदवी अभ्यासक्रमांना वळण्याची शक्यता प्राचार्यांनी वर्तविली आहे. गेल्या वर्षी इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता साधारण एक लाख २३ हजार ४३१ होती. नोंदणी करणारे अनेक जण परीक्षाच देत नाहीत गेल्यावर्षी झालेल्या सीईटीसाठी पाच लाख ४२ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्षात तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांची उपस्थितीची टक्केवारी ७१.२७ टक्के होती. त्यामुळे साधारण २९ टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यानुसार चार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असताना, त्यापैकी साधारण एक लाख विद्यार्थी परीक्षा देणार की नाही, याबाबत साशंकता आहे. यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची दाट शक्यता आहे. सीईटीसाठी नोंदणी का कमी ? राज्यात सलग दोन वर्षांपासून करोनाचा प्रादुर्भाव आहे. त्याचवेळी करोनाला रोखण्यासाठी गेल्या वर्षी लॉकडाउन होते, तर यंदा कडक निर्बंध होते. त्यामुळे काही पालकांच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले. या सर्वांमुळे पालकांची आर्थिक क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे पालकांना वाढणारे शैक्षणिक शुल्क भरणे अवघड झाले आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चरच्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे शुल्क ५० हजार ते दोन लाखांच्या घरात आहे. सध्याच्या परिस्थितीत हे शुल्क भरणे शक्य होत नसल्याने, विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. एमएचटी-सीईटीसाठी यंदा चार लाखांच्या आसपास नोंदणी झाली आहे. इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीही पूर्ण झाली आहे. सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे. - चिंतामणी जोशी, आयुक्त, सीईटी सेल


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CtrkxW
via nmkadda