Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २६, २०२१ WIB
Last Updated 2021-08-26T11:43:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET, JEE Main च्या नियमांमध्ये महत्वाचे बदल, जाणून घ्या Rojgar News

Advertisement
NEET, 2021: आणि JEE Main परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने जुन्या नियमामध्ये बदल केला आहे. त्यानुसार NEET आणि JEE Main दोन्ही परीक्षांच्या रँक लिस्टमध्ये जुन्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. यापूर्वी, आणि जेईई मेनच्या रँक यादीमध्ये, जे विद्यार्थी वयाने मोठे होते त्यांना प्रथम संधी देण्यात येत होती. उदाहरणार्थ जर दोन विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले असतील, तर त्यांच्यातीलज्या उमेदवाराचे वय जास्त असेल त्यांना प्राधान्य दिले जात होते. हा नियम २०२० पर्यंत लागू होता पण २०२१ पासून हा नियम बदलण्यात आला आहे. (JEE Main) आणि नीट साठी २०२१ (NEET 2021) रँक लिस्ट तयार करण्यासाठी एनटीए टाय-ब्रेकिंग पॉलिसी वापरते जेणेकरून कोणत्याही दोन उमेदवारांना समान रँक मिळणार नाही. वर्ष २०२० मध्ये जेईई मेन (JEE Main)इंजिनीअरिंग पेपरसाठी टायब्रेकिंग धोरण अवलंबले. त्यानुसार गणितामध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांना प्राधान्य देण्यात आले. असे करुन देखील गुण समान झाले तर कमी मायनस पॉईंट असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. यानंतर वयाने मोठे असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येील. BArch आणि BPlanning पेपर्ससाठी सुद्धा अशाच पद्धतीचा वापर करण्यात आला होता. पण यावर्षी हे टायब्रेकिंग धोरण जेईई मेन आणि नीट परीक्षेतून काढून टाकण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mBk9OH
via nmkadda