Advertisement
NEET: तामिळनाडू सरकारकडून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश चाचणी ( 2021) मध्ये सवलत देण्यात येऊ शकते. सरकार यासाठी विधानसभेत विधेयक सादर करणार आहे. आधीच्या एआयएडीएमके सरकारनेही असा प्रयत्न केला होता पण राष्ट्रपतींच्या मंजुरीअभावी तो मागे पडला. अलीकडेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन विधानसभेत म्हणाले होते की, 'सरकार सुरु अधिवेशनातच हे विधेयक सादर करेल. राज्यातील NEET परीक्षा रद्द करण्याबाबत आमदार उदानिधी स्टालिन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, न्यायमूर्ती एके राजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या अहवालाचा सखोल अभ्यास केल्यानंतर सरकार विधेयक सादर करेल.' गेल्या महिन्यात सादर केला अहवाल विशेष म्हणजे न्यायमूर्ती एके राजन यांनी एका महिन्यापूर्वी राज्य सरकारला १६५ पानांचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर न्यायमूर्ती राजन म्हणाले की, 'अनेक लोक प्रवेश परीक्षेच्या विरोधात होते. त्यांचे म्हणणे होते की, NEET फक्त श्रीमंत समाजातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्यास मदत करते, ज्यामुळे ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता भासू शकते.' विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करत राहण्याचा सल्ला तामिळनाडू सरकार मात्र उमेदवारांना NEET ची तयारी करण्यास आग्रह करत आहे. सरकारला नको असली तरी विद्यार्थ्यांनी NEET ची तयारी सुरु ठेवली पाहिजे असे विधान आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी केले होते. सध्या तामिळनाडूचे राजकारण वैद्यकीय चाचणीच्या भोवती फिरत आहे. AIADMK आणि DMK या दोन्ही सरकारांनी NEET ला कडाडून विरोध केला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sIrvB0
via nmkadda