Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २५, २०२१ WIB
Last Updated 2021-08-25T11:43:55Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET PG 2021साठी नोंदणी आणि दुरुस्तीची विंडो होणार बंद, जाणून घ्या अपडेट Rojgar News

Advertisement
NEET PG 2021: राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (NBE)ने नीट पीजी २०२१ साठी नोंदणी आणि करेक्शन करण्याची विंडो २५ ऑगस्टला रात्री ११.५५ मिनिटांनी बंद होणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनही परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी केली नसेल त्यांच्याकडे अजूनही वेळ शिल्लक आहे. याशिवाय परीक्षा फॉर्म भरताना काही गडबड झाली असल्यास त्यात दुरुस्ती देखील करता येणार आहे. यासाठी उमेदवाराने राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाऊन लॉगिन करावे लागेल. यामध्ये उमेदवार फॉर्ममध्ये जन्मतारीख, उमेदवारांची श्रेणी, लिंग, शारीरिक अपंगत्व स्थिती आणि EWS मध्ये बदल करु शकतील. या व्यतिरिक्त इतर कोणतेही बदल स्वीकारले जाणार नाहीत. २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. यापूर्वी ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार होती. पण देशभरात करोना केसेसमध्ये वाढ झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. १५ एप्रिल रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. आरोग्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितले होते की, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल. त्याचवेळी मेच्या सुरुवातीला केंद्र सरकारने NEET PG परीक्षा ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. या उमेदवारांना होणार फायदा NEET PG प्रशासनाने अलीकडेच मेडिकल इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी कट ऑफची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच जे उमेदवार २१ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आपली इंटर्नशिप पूर्ण करत आहेत आणि नीट-पीजी २०२१ संबंधी सर्व मानदंड पूर्ण करत आहेत, ते या करेक्शन विंडोच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mASddV
via nmkadda