Advertisement
NEET Dictionary in marathi : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या स्थानिक माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी, पुण्यातील LFU (Lift for Upliftment) या संस्थेने नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (NCRET) अभ्यासक्रमात इंग्रजी ते मराठी शब्दकोश सुरू केला आहे. NEET साठी विद्यार्थी मराठी भाषेतून शिक्षण घेऊ शकतात पण मराठीत कोणतीही पाठ्यपुस्तके किंवा संदर्भ पुस्तके उपलब्ध नाहीत. आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भाषा अडथळा बनत आहे. अन्यथा त्यांच्यामध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्याची क्षमता आहे. अशा NEET साठी पात्र गरजू विद्यार्थ्यांना LFU ही संस्था मोफत प्रशिक्षण देतात 'सरकारी आकडेवारीनुसार, ३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये मराठी भाषेत NEET असावे या पर्यायाची निवड केली होती. दुर्दैवाने, मराठी भाषेत कोणतेही पाठ्यपुस्तक किंवा संदर्भ पुस्तक नव्हते.' असे एलएफयूचे उपाध्यक्ष डॉ. फारूक फरास म्हणाले. इंग्रजी ते मराठी शब्दकोशात NCERT इयत्ता अकरावी आणि बारावीच्या रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राच्या पुस्तकांमध्ये नमूद केलेल्या सर्व इंग्रजी शब्दांचा मराठी सममूल्य शब्दआहे. वैद्यकीय शिक्षण महाग झाले असताना आर्थिक पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांना NEET साठी प्रशिक्षित करणे देखील कठीण झाले आहे. 'आदिवासी विद्यार्थी इंग्रजीकडे सहज आणि सोप्या दृष्टीने पाहत नाहीत. इंग्रजीच्या बाबतीत त्यांच्या मनात खूप भीती असते. अनेकजण भाषेच्या अडथळ्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेण्याचा विचार सोडून देतात असे मेळघाटमध्ये एलएफयू विद्यार्थ्यांना शिकवणारे डॉ.संतोष चाटे म्हणाले. गेल्यावर्षी तिथली मराठी आणि आदिवासी भाषा समजून शितवताना आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. पुढच्यावर्षी आम्ही डिक्शनरीमध्ये कोरकू आणि गोंडी सारख्या आदिवासी भाषा जोडण्याचा विचार करत आहोत असेही ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gLYJeh
via nmkadda