Advertisement
Admit Card 2021: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG 2021) १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नीट परीक्षा २०२१ साठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. एनटीएच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर तपासू आणि डाऊनलोड करु शकता. एनटीएने २०२१ संदर्भात जुलैमध्ये अधिकृत नोटीस जाहीर केली आहे. यानुसार नीट २०२१ साठी प्रवेश पत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. NEET 2021 चे परीक्षा शुल्क १५ ऑगस्टपर्यंत भरण्यात येत होते. त्यानंतर एनटीएने उमेदवारांना नीट २०२१ चे नोंदणी शुल्क भरण्यासाठी आणखी वेळ दिला होता. प्रवेश पत्र असे करा डाऊनलोड प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जा. होमपेज असलेल्या नीट यूजी २०२१ प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन टॅब उघडेल. येथे तुमचा लॉगिन क्रेडेंशिअल- रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड एंटर करा सबमिट करा. आता तुमचे नीट प्रवेश पत्र स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रवेश पत्र डाउनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा. नीट २०२१ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १३ जुलै पासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०२१ होती. त्यानंतर तारीख वाढवून १० ऑगस्ट २०२१ करण्यात आली. अर्जामध्ये बदल करण्यासाठी ११ ते १४ ऑगस्टपर्यंत विंडो खुली करण्यात आली. तसेच उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी १३ ते १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gaW5OT
via nmkadda