Advertisement
NEP 2020: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय () च्या अंतर्गत प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन केले. प्रमुख उपक्रमाचा एक भाग म्हणून NEP २००२० च्या एक वर्षाच्या कामगिरीची पुस्तिका आणि NCERT ची पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. NEP च्या या प्रमुख उपक्रमांचे प्रक्षेपण यूट्यूब आणि शिक्षण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरही लाइव्ह करण्यात आले. शिक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, एनसीईआरटीच्या पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर २०२१-२२ मध्ये अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकातून शिक्षणाचे परिणाम, विषय आणि धड्यासंदर्भात मनोरंजक आणि आव्हानात्मक उपक्रमांचा आठवड्याचा आढावा घेतला जाणार आहे. NIPUN अंतर्गत देशातील प्रत्येक मुलं २०२६-२७ पर्यंत तिसरीच्या अखेरीपर्यंत मूलभूत साक्षर आणि आकडेवारी शिकू शकेल. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय शिक्षणमंत्री २५ ऑगस्ट रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) येथे दीक्षा (DIKSHA) आणि व्हर्च्युअल शाळेत संसाधनांचे उद्घाटन करणार आहेत. शिक्षण विभागाने निपुण भारत अंतर्गत एक व्यापक मार्गदर्शक तत्त्व विकसित केले आहे. याअंतर्गत राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि शालेय स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणीची यंत्रणा उभारण्यात येणार असून यामध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता तसेच प्रशासकीय बाबींचा समावेश आहे. तत्पूर्वी, जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात देशभरातील शिक्षण क्षेत्रातील धोरणकर्ते, विद्यार्थी, शिक्षक यांना संबोधित केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Wie8f1
via nmkadda