Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २१, २०२१ WIB
Last Updated 2021-08-21T14:43:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEST 2021: नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्टची आन्सर की जारी Rojgar News

Advertisement
2021 Answer Key: नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (, NEST) २०२१ ची उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. भुवनेश्वर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (NISER) आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न अणुऊर्जा विभागाच्या सेंटर फॉर एक्सेलन्स इन बेसिक सायन्सच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा होते. NEST ची प्रोव्हिजनल आन्सर-की आणि आन्सरशीट सर्व उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आईडी वर पाठवण्यात येईल. जे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, ते ही उत्तरतालिक पाहू शकतील. ही प्रवेश परीक्षा १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. याव्यतिरिक्त जर कोणत्या उमेदवाराला उत्तरतालिकेबाबत हरकत असेल ते हरकती नोंदवू शकतात. पुढील ईमेल आयडीवर उमेदवार हरकती नोंदवू शकतात. nest21.biology@cbs.ac.in nest21.chemistry@cbs.ac.in nest21.mathematics@cbs.ac.in nest21.physics@cbs.ac.in उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की exam@niser.ac.in पर प्रश्नांची एक प्रत जोडावी लागेल. ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये प्रश्न आयडी वगैरै माहिती नमूद करावी लागेल. आपला मुद्दा संक्षिप्तपणे मांडावा. सर्व वैध प्रश्न विचारात घेतले जातील. हरकती नोंदवण्यासाठी उमेदवारांना २३ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. हरकतींवर विचार करून अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. अधिकृत माहितीनुसार, NEST 2021 चा निकाल १ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाईल. या परीक्षेसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j5lhrN
via nmkadda