Advertisement
Celebrate : १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान साजरा केला जात आहे. हा संस्कृत सप्ताह प्राचीन भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी साजरा केला जातो. सुरू झालेल्या संस्कृत सप्ताहाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना प्राचीन भाषा शिकण्याचा आणि प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि भाषांबद्दल नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी आणि संस्कृत सर्वांना सहज उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली. "ऋषी, मुनी आणि तपस्वी यांचे ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा अमूल्य वारसा जतन करा, संस्कृत ही भारताची संस्कृती, सभ्यता आणि अनेक भाषांचा आधार आहे. १९ ते २५ ऑगस्ट दरम्यान संस्कृत सप्ताह साजरा केला जात असताना, यांनी जनतेला या प्राचीन भाषा शिकण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवाहन केले आहे. 'संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि भाषांबद्दल नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी आणि संस्कृत लोकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिज्ञा घेऊया', असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केले. संस्कृत सप्ताहाबद्दल नागरिकांना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संस्कृत भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. जगभरात भाषेची लोकप्रियता वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यानचा संस्कृत सप्ताह लोकांमध्ये नवीन रस आणि उत्साह निर्माण करेल आणि संस्कृत भाषेच्या प्रसारामध्ये महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. BHU मध्ये हिंदू धर्मावर पदवी अभ्यासक्रम बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) प्रथमच हिंदू धर्म हा विषय म्हणून शिकवला जाईल. बीएचयूचे कुलगुरू विजयकुमार शुक्ला यांनी सांगितले की, विद्यापीठ हिंदू धर्म पदवी अभ्यासक्रम सुरू करत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थी प्राचीन ज्ञान, परंपरा, कला, विज्ञान आणि कौशल्ये शिकतील. बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू विजयकुमार शुक्ला म्हणाले की, विद्यापीठ ४० सिट्स घेऊन दोन वर्षांचा हिंदू धर्म अभ्यासक्रम सुरू करत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XIgm85
via nmkadda