Advertisement
ISRO 2021: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोमध्ये(ISRO) काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार यासंदर्भात सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. २४ ऑगस्टपासून या रिक्त पदांसाठी अर्ज सुरु होणार आहेत. इस्त्रोच्या भरतीअंतर्गत या विभागात चालक, कुक, फायरमन आणि केटरिंग असिस्टंट या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन यासाठी अर्ज करु शकतात. ६ सप्टेंबरपर्यंत यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी लिक्विड प्रोप्युलशन सिस्टिम सेंटरची अधिकृत वेबसाईटवर lpsc.gov.in वर जावे. यानंतर तिथे दिलेल्या पदभरतीच्या लिंकवर जाऊन यासाठी अर्ज करावा. या भरतीप्रक्रियेतून एकूण ८ जागा भरल्या जाणार आहेत. पदांचा तपशील हेवी व्हेईकल ड्रायव्हर याची २ पदे रिक्त असून यासाठी १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये पगार देण्यात येईल. लाईट व्हेईकल ड्रायव्हरची २ पदे रिक्त असून यासाठी १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० इतका पगार देण्यात येईल. कुकच्या एका पदावर निवड झालेल्या उमेदवाराला आणि फायरमन पदाच्या २ पदांसाठी देखील इतकाच पगार असेल. तर केटरिंग अटेंडंटच्या एका पदासाठी १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये पगार मिळेल. पात्रता या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षणााचा तपशील, वयोमर्यादा यांचा पात्रता निकष नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच फायरमन आणि केटरिंग अटेंडंड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान २५ वर्षे असणे गरजेचे आहे. तर इतर पदांसाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा ३५ वर्षे असणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती मिळणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kkoNOo
via nmkadda