Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २७, २०२१ WIB
Last Updated 2021-08-27T12:43:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दिल्लीतील शाळा १ सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने उघडणार Rojgar News

Advertisement
दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने १ सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १ सप्टेंबर २०२१ पासून नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शाळेत येईल तर त्यानंतर ८ सप्टेंबर २०२१ पासून इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग सुरू होतील. शुक्रवारी दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. तत्पू्र्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते की दिल्ली सरकार शाळा उघडण्याबाबत विचाराधीन असून संबंधित घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. ज्या राज्यांनी शाळा उघडल्या तेथे त्यानंतर संमिश्र परिणाम दिसून आले, त्याचाही आढावा घेत असल्याचे केजरीवाल म्हणाले होते. यापूर्वी दिल्ली सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने आपल्या अहवालात टप्प्याटप्प्याने शाळा उघडण्याची शिफारस केली होती. अहवालात केवळ पहिल्या टप्प्यातच वरिष्ठ वर्गांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर शाळा मध्यमवर्गासाठी आणि नंतर प्राथमिक मुलांसाठी उघडल्या पाहिजेत. शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय डीडीएमएच्या बैठकीत घेण्यात येणार होता. त्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या नेतृत्वाखाली डीडीएमएची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत एलजीने अधिकाऱ्यांना सविस्तर योजना तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दिल्ली सरकारने स्थापन केलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली. दरम्यान, अलीकडेच गुजरात सरकारनेही २ सप्टेंबर २०२१ पासून इयत्ता सहावी ते आठवीच्या शाळा पुन्हा उघडण्याची घोषणा केली आहे. सरकारने शाळांना ५० टक्के क्षमतेने वर्ग आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे कोविड -१९ च्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता हिमाचल प्रदेश सरकारने ४ सप्टेंबरपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शिमला येथे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, यापूर्वी २८ ऑगस्टपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर, आता वेळ मर्यादा आणखी वाढवण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zrccQ2
via nmkadda