Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-08-06T08:43:34Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अकरावी 'सीईटी'साठी अन्य मंडळांचे ३६ हजार विद्यार्थी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या 'सीईटी'साठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), इंडियन स्कूल ऑफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) आदी मंडळांच्या ३६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे, तर राज्य मंडळाचे विद्यार्थी मिळून एकूण १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्य मंडळाकडून आता सध्या वेळापत्रकाप्रमाणे २१ ऑगस्ट रोजी 'सीईटी'च्या आयोजनाची तयारी सुरू आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी अकरावी 'सीईटी' घेण्याचा निर्णय झाला. या 'सीईटी'साठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची राज्य मंडळाने दोन ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत एकूण ११ लाख ९६ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी ७६ हजार ८६ विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण आहेत, तर २२ हजार १२८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरूनही 'सबमिट' केला नाही, तर १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यापैकी ३५ हजार ८१४ विद्यार्थी अन्य मंडळांचे आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालात १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांची संख्या पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी 'सीईटी'साठी अर्ज भरला नाही. सर्वाधिक अर्ज मुंबईतून 'राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक दोन लाख ५५ हजार ६४३ अर्ज मुंबई विभागातून भरले गेले आहेत, तर सर्वांत कमी २० हजार ५६६ अर्ज कोकण विभागातून भरले गेले आहेत. मुंबईखालोखाल पुणे विभागातून एक लाख ३२ हजार २५५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. दोन हजार ७३४ अर्ज जुन्या विद्यार्थ्यांचे आहेत,' अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U0onDS
via nmkadda