Advertisement
Degree and : अनुदान आयोग ()कडून विद्यार्थ्यांची डिग्री आणि त्यांच्या सर्टिफिकेट पडताळणी होणार नाही. डिग्री पडताळणीचे (Degree Verification)काम आमचे नाही असे यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यूजीसीने विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन डिग्री आणि प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणीचे कााम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी विद्यापीठांच्या कुलगुरुंना यासंदर्भात पत्र लिहिले. यूजीसीकडे विविध विद्यापीठांनी दिलेल्या डिग्री आणि प्रमाणपत्रांच्या सत्यतेसंदर्भात अनेक निवेदन येत असतात असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. जैन यांनी स्पष्ट केले की, यूजीसीने वेळोवेळी विद्यार्थ्यांना सूचना केली की डिग्री आणि प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणार नाही. डिग्री आणि प्रमाणपत्र सत्यता पडताळणीचे काम विद्यापीठांना करावे लागेल. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन डिग्री, डिप्लोमा आणि प्रमाणपत्रांसंदर्भातील निवेदन अथवा स्पष्टीकरण वेळेत संपवावी. यूजीसीकडे मोठ्या संख्येने अर्ज येतात, ज्यामध्ये विद्यार्थी डिग्री आणि इतर प्रमाणपत्रांच्या व्हेरिफिकेशनची मागणी करतात. अशावेळी संबंधित विद्यापीठ डिग्री आणि इतर डॉक्यूमेंट्स व्हेरिफिकेशन करतील. यूजीसीने विद्यापीठांच्या कुलगुरुंना देखील निर्देश दिले आहेत की, विद्यार्थ्यांनी डिग्री, डिप्लोमा आणि इतर प्रमाणपत्रांच्या व्हेरिफिकेशनची मागणी केली तर ती वेळेत पूर्ण करावी. नोकरीसाठी व्हेरिफिकेशन महत्वाचे सर्वसाधारणपणे डिग्री आणि इतर कागदपत्रांची गरज विद्यार्थ्यांना नोकरी आणि इतर शहरातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश (Admission) घेताना लागते. विद्यार्थ्यांनी जमा केलेली कागदपत्र (Documents)योग्य आहेत आणि यामध्ये कोणताही फेरफार नाही हे डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशनमुळे स्पष्ट होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WaSQzA
via nmkadda