Advertisement
Oil India : ऑईल इंडिया लिमिटेडतर्फे ग्रेड ३ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर ट्रेड, मेकॅनिक मोटर वाहन व्यापार, मशिनिस्ट ट्रेड, मेकॅनिक डिझेल ट्रेड, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ट्रेड आणि इतर पदांसाठी नेमणुका केल्या जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑईल इंडियाची अधिकृत वेबसाइट @oil-india.com वर लॉगिन करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाली आहे. तसेच २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. महत्वाच्या तारखा अर्ज सुरु होण्याची तारीख - २४ ऑगस्ट २०२१ अर्ज करण्याची शेवटची तारीख - २३ सप्टेंबर २०२१ रिक्त पदाचा तपशील इलेक्ट्रीशियन ट्रेड- ३८ पदे फिटर ट्रेड - १४४ पदे मेकॅनिक मोटर वाहन व्यापार - ४२ पदे मशीनिस्ट डिझेल व्यापार - ४० पदे बॉयलर अटेंडंट- ०८ पदे टर्नर ट्रेड- ०४ पदे वेल्डर ट्रेड- ०६ पदे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित- ४४ पदे शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रीशियन ट्रेड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. आणि सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावी. तसेच शासकीय विद्युत परवाना मंडळाने जारी केलेला वैध विद्युत परमिट (भाग/वर्ग I आणि भाग/वर्ग II) असणे आवश्यक आहे. मशिनिस्ट ट्रेड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सरकारी मान्यताप्राप्त संस्थेकडून मशिनिस्ट ट्रेडमध्ये ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवार सरकारी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असावा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kjNYRp
via nmkadda