बारावी कला शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम? जाणून घ्या... Rojgar News

बारावी कला शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम? जाणून घ्या... Rojgar News

सुदाम कुंभार उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा (बारावी) निकाल अलीकडेच जाहीर झाला आहे. विज्ञान व वाणिज्य शाखांचे बहुतांश विद्यार्थी हे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. मात्र कला शाखेचे विद्यार्थी स्वतःला वंचित घटक असल्यासारखे समजतात आणि पुन्हा कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेताना दिसतात. यावर्षी कला शाखेचा निकाल ९९.८३% लागलेला आहे. म्हणजेच हा निकाल नेहमीपेक्षा उत्कृष्ट आहे असेच म्हणावे लागेल. जर तुम्ही यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेला आहात आणि कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा हा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर विविध अभ्यासक्रमांची ही माहिती. मेहनत, जिद्द, चिकाटी, स्पर्धेत टिकून राहण्याची तयारी आणि सातत्यपूर्ण अभ्यास याला पर्याय नाही. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम : ० बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बी.बी.ए.) व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे असेल, तर तुम्ही या अभ्यासक्रमास पसंती देऊ शकता. हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यामध्ये व्यवसायातील व्यवस्थापनाचे कौशल्य, वित्तीय व्यवहार, लेखा व्यवहार, मानवी संसाधन व्यवस्थापन आणि विकास आणि विपणन इत्यादी क्षेत्रात तुम्हाला व्यवसायाच्या संधी प्राप्त होऊ शकतात. ० बॅचलर ऑफ फाइन आर्ट (बी.एफ. ए.) कला क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तुम्ही बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम निवडू शकता. या अंतर्गत फोटोग्राफी, गायन, वादन, नृत्त्य, संगीत इत्यादी कला प्रांतात तुम्हाला अभिरुची असल्यास तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. ० बॅचलर ऑफ जर्नालिझम (बी. जे.) लेखन कौशल्य असेल तर तुमच्यासाठी पत्रकारिता हा एक चांगला पर्याय आहे. बारावीनंतर हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तुम्ही करू शकता. या माध्यमातून भविष्यात तुम्हाला प्रिंट मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या चांगल्या संधी आहेत. ० बॅचलर ऑफ आर्ट्स अँड बॅचलर ऑफ लॉ (बी.ए.एल.एल.बी.) तुम्हाला कायद्याचा अभ्यास करण्याची आवड असेल तर बी.ए.एल.एल.बी. ह्या पाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमास पसंती देऊ शकता. यासाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत प्रविष्ट होऊन उत्तीर्ण व प्रवेशासाठी पात्र होणे अनिवार्य आहे. ० बॅचलर ऑफ आर्ट्स (बी.ए) तुमची नैसर्गिक गुणवत्ता सिद्ध करण्याच्या दृष्टीने तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच बी.ए. ही पदवी संपादन करत असताना भविष्याच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर इंग्लिश, अर्थशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे यांचा सखोल अभ्यास करून तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना प्रविष्ट होऊन प्रशासकीय सेवेत दाखल होऊ शकता. या अभ्यासक्रमांतर्गत तुम्ही तुमच्या कलागुणांना वाव देऊन नृत्यकला, गायन, वादन, लेखक इत्यादी कौशल्ये संपादन करू शकता. भाषेवर प्रभुत्व असल्यास तुम्ही इंग्रजी भाषेव्यतिरिक्त जर्मन, फ्रेंच, रशियन इत्यादी परकीय भाषा शिकून स्वतःचं वेगळं करिअर घडवू शकता. ० बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन (बी.सी.ए.) उच्च माध्यमिक स्तरापर्यंत जरी आपण कला शाखेचे शिक्षण पूर्ण केलेले असले, तरीसुद्धा आयटी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकता. बॅचलर्स डिग्री ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन ही पदवी इंजिनीअरिंग इन कम्प्युटर सायन्स इतकीच उपयुक्त व दर्जेदार आहे. तुमचं कौशल्य या क्षेत्रात दाखवणं गरजेचं आहे. भविष्यात सॉफ्टवेअर तसेच अॅप्लिकेशन डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट इत्यादी क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्याकडे चांगली तांत्रिक कौशल्ये तसेच संगणक हाताळण्याची अभिरुची आणि उपयोजन कौशल्य असणं गरजेचं आहे. (लेखक निवृत्त प्राचार्य आणि समुपदेशक आहेत.) क्रमशः


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VCqbUk
via nmkadda

0 Response to "बारावी कला शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम? जाणून घ्या... Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel